ठळक मुद्देविराट कोहली धावांसाठी भुकेला आहे, ती भूक त्याच्या डोळयांमध्ये दिसते. 50 षटकांच्या स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन वर्ल्ड कप जिंकले आहेत.
नवी दिल्ली - बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर असलेल्या सुरेश रैनाने कर्णधार विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पुढच्यावर्षी इंग्लंडमध्ये होणा-या वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरेल. विराटच या वर्ल्ड कपमध्ये मालिकावीराचा पुरस्कार पटकावेल असा विश्वास सुरेश रैनाने व्यक्त केला. तो इंडिया टुडेशी बोलत होता.
विराट कोहली धावांसाठी भुकेला आहे. ती भूक त्याच्या डोळयांमध्ये दिसते. त्याचा फिटनेस उत्कृष्ट आहे. प्रत्येकवेळी तो धावफलक हलता ठेवतो. खराब चेंडूंवर खो-याने धावा वसूल करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. आजच्याघडीला तो जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे यात कुठलीही शंका नाही. विराट वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आतुर आहे. कदाचित इंग्लंडमध्ये होणा-या या स्पर्धेत तो मालीकावीराचा पुरस्कार पटकावू शकतो असे रैनाने सांगितले. 50 षटकांच्या स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन वर्ल्ड कप जिंकले आहेत. 1983 साली कपिल देवच्या नेतृत्वाखाली आणि 2011 साली एम.एस.धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दोनवेळा वर्ल्ड कप जिंकला आहे.
संघाबाहेर ठेवल्याचं दुःख
चांगली कामगिरी करुनही मला भारतीय संघातून बाहेर ठेवण्यात आलं होतं. ज्यामुळे मी खूप दुखावलो होतो. पण आता मिळालेल्या संधीचं सोनं करणार आहे, असं टीम इंडियाचा फलंदाज सुरेश रैनाने म्हंटलं आहे. सुरेश रैनाने बऱ्याच काळानंतर भारताच्या टी-20 संघात पुनरागमन केलं आहे. याचबद्दल बोलताना सुरेश रैनाने हे वक्तव्य केलं आहे.
'चांगली कामगिरी करूनही मला भारतीय संघाबाहेर ठेवण्यात आलं होतो. म्हणून मी दुःखी झालो. पण आता मी यो-यो टेस्ट पास केली आहे. त्यामुळे मी आता पूर्णपणे फिट आहे. एवढ्या महिन्यांच्या कठोर ट्रेनिंगमुळे भारतासाठी खेळण्याची माझी इच्छा आणखी प्रबळ झाली आहे', असं सुरेश रैना याने म्हंटलं.
'भारतासाठी जास्तीत-जास्त दिवस खेळावं हाच माझा प्रयत्न असणार आहे. मला 2019चा विश्वचषक खेळायचा आहे. कारण माझी इंग्लंडमधील कामगिरी चांगली होती. माझ्यामध्ये अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे. त्यामुळे मला आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन टी-20 मध्ये चांगली कामगिरी करायची आहे.' असंही सुरेश रैना यांनी म्हंटलं. 31 वर्षीय सुरेश रैना 223 वनडे, 65 टी-20 आणि 18 कसोटी सामने खेळला आहे.
Web Title: The appetite of runs appears in Virat's eye, which will be the deciding factor in the next World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.