Join us

रणजीत डीआरएस लागू करा, नाणेफेक संपुष्टात आणा...

दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा याला नाबाद ठरविण्यात आले होते. चेंडू मात्र त्याच्या बॅटला लागून गेल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते. त्यानंतर पुजाराने शतक झळकवून सामन्याचा निकाल फिरविला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 04:37 IST

Open in App

मुंबई : रणजी चषक स्पर्धेत निर्णय समीक्षा प्रणालीचा (डीआरएस) अवलंब व्हावा, शिवाय नाणेफेकीची प्रचलित पद्धत संपविण्यात यावी यासह अनेक प्रस्ताव विविध राज्यांचे कर्णधार आणि प्रशिक्षक यांनी भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाला (बीसीसीआय) सादर केले. बीसीसीआयने शुक्रवारी येथे संमेलनाचे आयोजन केले होते.डीआरएसचा वापर केवळ आंतरराष्टÑीय सामन्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे. मागच्या रणजी सत्रात पंचांनी अनेक चुकीचे निर्णय दिले. या निर्णयावर नाराज कर्णधार आणि प्रशिक्षकांनी आता डीआरएसचा वापर स्थानिक स्तरावर करण्याची आग्रही मागणी केली. रणजी सामन्यांचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण होत असल्याने डीआरएस लागू करण्यास हरकत नाही, असे अनेकांचे मत होते.मागच्या सत्रात सौराष्टÑ आणि कर्नाटक यांच्यात झालेल्या रणजी करंडकाच्या उपांत्य सामन्यादरम्यान पंचांचा चुकीचा निर्णय चांगलाच गाजला. दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा याला नाबाद ठरविण्यात आले होते. चेंडू मात्र त्याच्या बॅटला लागून गेल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते. त्यानंतर पुजाराने शतक झळकवून सामन्याचा निकाल फिरविला होता.त्याचप्रमाणे, प्रत्येक सामन्याआधी नाणे हवेत भिरकावून संघांना फलंदाजी- गोलंदाजी निवडण्याची मुभा दिली जाते. ही प्रचलित पद्धत मोडित काढून पाहुण्या संघाला फलंदाजी वा गोलंदाजी घेण्याचा अधिकार बहाल करण्यात यावा, असा नवा प्रस्ताव पुढे आला आहे. विविध राज्यांचे कर्णधार आणि प्रशिक्षकांनी यावेळी दुलीप ट्रॉफी तसेच, इराणी करंडकाच्या महत्त्वाविषयी आणि प्रासंगिकतेविषयी चर्चा केली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :रणजी करंडक