नवी दिल्ली : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाईबरोबरच जबाबदारी सांभाळण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी प्रशासकांच्या समितीने (सीओए) आपल्या आठव्या अहवालात सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे.
सीओएने त्यांच्या १७ पानी अहवालात तीन मुद्यांवर न्यायालयाने आदेश द्यावेत, अशी विनंतीही केली आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती केली जावी व ही नियुक्ती लोढा समितीच्या शिफारशीअंतर्गत असावी, अशीही विनंती सीओएने केली आहे.
लोढा समितीची शिफारस मान्य करणे आणि त्याअनुषंगाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या घटनेत दुरुस्ती करताना उपस्थित असलेल्या एमसीएच्या पदाधिकाऱ्यांवरसुद्धा कठोर कारवाई करण्यात यावी, असेसुद्धा या अहवालात म्हटले आहे.
त्याआधी एमसीएचे सचिव रियाज बागवान यांनी लोढा समितीच्या शिफारशीचे पालन करणाºया नवीन संशोधित घटनेनुसार निवडणुका २ मे रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे सर्व जिल्हा संघटनांना सर्क्युलर पाठवले होते. तथापि, सीओएने जेव्हा नव्या घटनेची समीक्षा केली तेव्हा त्यात अनेक उणिवा आढळल्या आणि त्याचा उल्लेख दोन पानांच्या पत्रात करताना निवडणुका झाल्यास त्या अमान्य करण्यात येतील, असे म्हटले होते. सीओएने आपल्या पत्रात लिहिले, की निवडणुकांची तारीख २ मे रोजी प्रस्तावित केली आहे आणि हे न्यायाधीश लोढा समितीद्वारे जारी केलेल्या आदेशाच्या विरुद्ध आहेत.
Web Title: Appointment of MCA on MCA: Rai
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.