देशातील ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने लक्षवेधी यश मिळवले. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही सत्ता स्थापन करणारे स्पष्ट बहुमत भाजपला मिळाले आहे. या विजयानंतर भाजपचे कौतुक होत असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही विजयावर प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या उत्कृष्ट कामगिरीचे ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. मोदींनी मोदीस्टाईल विजयाचे कौतुक केले. तर, दुसरीकडे टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक आणि क्रिकेट कॉमेंटेटर रवि शास्त्रीनेही रवि शास्त्रीस्टाईलमध्ये भाजपचा विजय सांगितला.
हा आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा विजय आहे. तसेच, राज्यांमधील हॅटट्रिक ही २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत जिंकण्याची हॅटट्रिकची गॅरंटी आहे, असे म्हणत मोदींनी विधानसभेतील यशानंतर जनतेला आणि कार्यकर्त्यांना उद्देशून संबोधन केले. तत्पूर्वी पक्षाच्या मुख्यालयात पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करून मोदींचे भव्य स्वागत केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. मोदींसह भाजपच्या सर्वच नेत्यांनी विजयाचा आनंद साजरा केला आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही हा विजय विकास आणि जनकल्याणांच्या योजनांचा विजय असल्याचं म्हटलं.
भाजप नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीतील यशावर प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. दुसरीकडे क्रिकेट जगतातूनही भाजपच्या या विजयाचं अभिनंदन करण्यात आलंय. क्रिकेट कॉमेंटेटर रवि शास्त्री यांनी क्रिकेट कॉमेंट्री स्टाईल मोदी आणि शहा यांच्या नेतृत्त्वातील भाजपचा हा विजय असल्याच म्हटलं. अ टीम अॅट प्ले. क्लिनीकल. अब्स्युलिटली ब्रिलियंट, अ बुलडोझिंग परफॉरमन्स, आणि तो कसा... असे म्हणत रवि शास्त्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना मेन्शन केलं आहे.
नरेंद्र मोदी व अमित शहांच्या नेतृत्त्वात टीम भाजपने मैदानावर अफलातून कामगिरी केली. आक्रमक आणि अतिशय उत्कृष्ट खेळ केलाय, असे म्हणत शास्त्री यांनी भाजपच्या विजयाचं स्वत:च्या शब्दात वर्णन केलंय.
मोदीचा विरोधकांना इशारा
मतदारांनी भ्रष्टाचारात गुंतलेल्या या पक्षांना त्यांचे मार्ग सुधारण्याचा इशारा दिला आहे, अन्यथा लोक त्यांना संपवतील. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने निकाल आल्यानंतर पंतप्रधान मोदी भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. तत्पूर्वी, ते पक्षाच्या मुख्यालयात पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.