हैदराबाद, आयपीएल 2019 : जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या वादळी खेळीनंतर मोहम्मद नबीच्या फिरकीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. बेअरस्टो आणि वॉर्नर या दोघांनी शतकी खेळी करून सनरायझर्स हैदराबादला 20 षटकांत 2 बाद 231 धावांचा डोंगर उभा करून दिला. प्रत्युत्तरात बंगळुरुचा संपूर्ण संघ 113 धावांवर माघारी परतला. हैदराबादने हा सामना 118 धावांनी जिंकला. बंगळुरू संघाला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. या लाजीरवाण्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून विराट कोहलीनं कर्णधारपद सोडलं.
IPL 2019 : 16 वर्षीय प्रयासचे RCBकडून पदार्पण; युवराजपेक्षा ठरला होता महागडा
IPL 2019 : वॉर्नर-बेअरस्टो यांची जोडी जमली अन् विक्रमाला गवसणी घातली
एक खेळाडू म्हणून कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज असला तरी त्याच्यातील नेतृत्वगुणाची झलक अद्याप पाहायला मिळालेली नाही. सामना हातात असेपर्यंत आनंदी आणि रिलॅक्स असलेला कोहली कठीण प्रसंगात अनेकदा गांगरलेला पाहायला मिळाला आहे. अशा परिस्थितीत त्याने अनेकदा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे मदतीसाठी धाव घेतलेली आहे. DRS चा निर्णय घेतानाही कोहली अनेकदा चुकला आहे. त्यामुळे त्याचे नेतृत्वगुण हा नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतरही त्याच्या नेतृत्वगुणावर शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भले भारताने ऐतिहासिक विजय मिळवले असले तरी त्यात कोहली हा फलंदाज म्हणूनच चर्चेत राहिला. कर्णधार म्हणून त्याची स्तुती झालीच नाही.
काही दिवसांपूर्वी भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यानेही कोहलीच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करताना त्याला खोचक टोमणा मारला होता. धोनी व रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्जने आणि मुंबई इंडियन्सने प्रत्येकी तीन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. मात्र कोहलीच्या नेतृत्वात बंगळुरूने एकदाही आयपीएल जिंकू शकलेले नाही अशी तुलना त्याने केली होती. गंभीर म्हणाला होता की,‘मी कोहलीला मुत्सद्दी कर्णधार मानत नाही. कारण त्याने आयपीएल जिंकलेले नाही. कामगिरी चांगली असलेला कर्णधारच चांगला कर्णधार ठरू शकतो. आयपीएलमध्ये असे कर्णधार आहे की, ज्यांनी संघाला तीनदा जेतेपद मिळवून दिलेले आहे. त्यामुळे कोहलीला अजुनही मोठी वाटचाल करायची आहे, असे वाटते. गेल्या सात- आठ वर्षांपासून तो आरसीबीचा कर्णधार आहे. फ्रँचायसीने त्याला कायम राखले त्यामुळे त्याने त्यांचे आभार मानायला हवे.कारण स्पर्धा न जिंकणाऱ्या कर्णधारांना एवढा प्रदीर्घ कालावधी मिळत नाही.’
IPL 2019 SRH vs RCB : वॉर्नर-बेअरस्टो जोडीनं कोहलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडवला
IPL 2019 : वॉर्नर-बेअरस्टो जोडीनं उठवलं विक्रमांचं वादळ
या पराभवानंतर कोहली म्हणाला,''आयपीएलमधील आमचा हा सर्वात लाजीरवाणा पराभव ठरला. या पराभवाचे स्पष्टीकरण देणं अवघड आहे. आम्ही सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलो. माजी विजेत्या हैदराबाद संघानं त्यांचा क्लास दाखवला. त्यांना रोखण्याचे आमचे सर्व प्रयत्न फोल ठरले. आम्हाला आमच्या फलंदाजीच्या क्रमवारीचा विचार करायला हवा. अजून 11 सामने आहेत आणि जेतेपदाच्या शर्यतीत राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. त्यामुळे या पुढीत प्रत्येक सामना जिंकावा लागेल."
टीप : हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे कोहली निराश नक्की झाला आहे, परंतु त्याने बंगळुरू संघाचे कर्णधारपद सोडलेलं नाही. आज April Fool च्या निमित्ताने थोडीशी गंमत. तुम्हीही बनवा मित्रांना Fool!
IPL 2019 SRH vs RCB : हैदराबादसमोर 'विराट'सेनेची शरणागती, बंगळुरूचा लाजीरवाणा पराभव
Web Title: April Fool: Big Breaking: Virat Kohli resign from RCB captaincy after a heavy defeat against sunrisers Hyderabad!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.