Join us

IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक

Arjun Tendulkar Mumbai Indians, IPL Auction 2025: शेवटच्या पाच मिनिटात, आपल्या १८ खेळाडूंचा कोटा भरण्यासाठी मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला ताफ्यात सामील करून घेतले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 21:09 IST

Open in App

Arjun Tendulkar Mumbai Indians, IPL Auction 2025: नुकत्याच झालेल्या मेगा लिलावात अर्जुन तेंडुलकरला अगदी शेवटच्या क्षणी मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले. सुरुवातील त्याला कुणीही खरेदीदार मिळालेला नव्हता. शेवटच्या पाच मिनिटात, आपल्या १८ खेळाडूंचा कोटा भरण्यासाठी मुंबईने अर्जुनला ताफ्यात सामील करून घेतले. लिलावाच्या पुढच्याच सामन्यात अर्जुन तेंडुलकरच्या विचित्र गोष्ट घडली. अर्जुनला तर चांगली कामगिरी करता आली नव्हतीच, त्यासोबत त्याचा संघही पराभूत झाला.

अर्जुन तेंडुलकरची असमाधानकारक कामगिरी

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात अर्जुन तेंडुलकरला चांगलाच फटका बसला. आंध्र प्रदेश विरुद्धच्या सामन्यात गोव्याकडून खेळताना अर्जुन तेंडुलकरने केवळ एक विकेट घेतली. पण त्यासाठी त्याने २२ चेंडू टाकले आणि ३६ धावा दिल्या. या सामन्यात गोव्याला मोठा पराभव स्वीकारावा लागला. गोव्याचा आंध्र प्रदेशने ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गोवा संघ २० षटकांत केवळ १५४ धावा करू शकला. प्रत्युत्तरात आंध्र संघाने केवळ १५.४ षटकांत लक्ष्य गाठले. कर्णधार रिकी भुईने गोव्याच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. या फलंदाजाने ३८ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या. भुईच्या बॅटमधून ६ षटकार आणि ५ चौकार आले.

'अनसोल्ड' राहिलेला भरत चमकला...

यंदाच्या IPL Mega Auction मध्ये खरेदीदार न मिळाल्याने अनसोल्ड राहिलेला भरत मात्र चमकला. श्रीकर भरतने ३८ चेंडूत ५७ धावांची नाबाद खेळी केली. गोव्याकडून प्रभुदेसाईने नाबाद ७१ धावा केल्या, तरीही त्याची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. या पराभवासह गोव्याने पराभवाची हॅट्ट्रिक केली. गोव्याचा संघ पहिला सामना मुंबईकडून हरला होता. दुसऱ्या सामन्यात तो सर्व्हिसेसकडून हरला आणि तिसऱ्या सामन्यात त्यांचा आंध्रकडून पराभव झाला.

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरआयपीएल २०२४आयपीएल लिलावमुंबई इंडियन्स