Join us  

अर्जुन तेंडुलकरने गिरवला वडिलांचा कित्ता; रणजी पदार्पणात झळकावले तडाखेबंद शतक

सचिन तेंडुलकरनेही डिसेंबर १९८८ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जोरदार पदार्पण करताना गुजरातविरुद्ध वयाच्या १५ व्या वर्षी  शतक ठोकले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 6:04 AM

Open in App

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : वडील सचिन तेंडुलकरप्रमाणेच रणजी क्रिकेट स्पर्धेत विक्रमी पदार्पण करताना अर्जुन तेंडुलकरने आपल्या पहिल्याच सामन्यात शतकी तडाखा दिला. त्याने राजस्थानविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना १७८ चेंडूंत शतक झळकावले. 

‘बाप तसा बेटा’ ही म्हण अर्जुन तेंडुलकरने खरी ठरवली आहे. रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना अर्जुनने वडील सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवत पदार्पणातच शतक झळकावले. विशेष म्हणजे सचिननेही १९८८ मध्ये डिसेंबर महिन्यातच रणजी पदार्पण करताना गुजरातविरुद्ध शतक झळकावले होते. अर्जुननेही डिसेंबर महिन्यातच या विक्रमी कामगिरीची पुनरावृत्ती केली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गोव्याने ५ बाद २१० धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर अर्जुनने सुयश प्रभूदेसाईसोबत जबरदस्त भागीदारी केली. यादरम्यान, सुयशने शतक झळकावले. बुधवारी नाबाद ४ धावांवरून पुढे खेळणाऱ्या अर्जुननेही आक्रमक पवित्रा घेत अर्धशतकाच्या दिशेने कूच केली. षटकार ठोकत त्याने अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर अर्जुनने अधिक आक्रमक खेळ केला. दुसऱ्या बाजूने सुयशने दीड शतक पूर्ण केले. दोघांनी दीडशे धावांची भागीदारी  पूर्ण करत गोव्याला भक्कम स्थितीत आणले. 

तेंडुलकर पिता-पुत्राचा डिसेंबर धमाकासचिन तेंडुलकरनेही डिसेंबर १९८८ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जोरदार पदार्पण करताना गुजरातविरुद्ध वयाच्या १५ व्या वर्षी  शतक ठोकले होते. सचिनने यासह रणजी पदार्पणात शतक ठोकणारा सर्वात युवा खेळाडूचा विक्रम नोंदवला होता. त्यानंतर आता ३४ वर्षांनी ज्युनिअर तेंडुलकर म्हणजे अर्जुनने आपल्या वडिलांच्या कामगिरीची पुनरावृत्ती करताना रणजी पदार्पणातच शतक ठोकले.

टॅग्स :अर्जुन तेंडुलकर
Open in App