सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर उघड चर्चा सुरू झाली आहे. आता त्याचे वारे भारतीय क्रिकेटमध्येही वाहू लागले आहेत. पण, आकाश चोप्रानं भारतीय क्रिकेटमध्ये असे होत नसल्याचा दावा भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं केला. पण, स्थानिक क्रिकेटमध्ये असे काही प्रमाणात होत असल्याचेही त्यानं मान्य केलं. स्वतःच्या यू ट्युब चॅनलवर त्यानं नेपोटिझमबाबत समजावताना महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन याच्या नावाचा उल्लेख केला.
अर्जुन तेंडुलकर सातत्यानं इंग्लंड दौऱ्यावर असतो आणि भारतीय संघ व इंग्लंड संघातील खेळाडूंना गोलंदाजी करताना अनेकदा दिसला. त्याच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टो दुखापतग्रस्त झाला होता. 2017च्या महिला वर्ल्ड कप फायनल स्पर्धेपूर्वी अर्जुनने महिला फलंदाजांना गोलंदाजी केली होती. पण, अजूनही त्याला वरिष्ठ संघात संधी मिळालेली नाही. ''तेंडुलकरचा मुलगा आहे, म्हणून अर्जुनला भारतीय संघात सहज संधी मिळणार नाही. 19 वर्षांखालील भारतीय संघातही मेरीट बेसवर निवड होत नाही. कामगिरीच्या जोरावरच खेळाडूंची निवड होते,''असे आकाश चोप्रा म्हणाला.
2018मध्ये अर्जुननं भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे युवा कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केलं होतं, परंतु अजुन त्याला मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळवता आलेले नाही. मुंबई इंडियन्सच्या नेट्समध्ये गोलंदाजी करण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे, परंतु त्याच्याकडे आयपीएल करारही नाही.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
हा माझा भारत नाही; 'त्या' घटनेनं आनंद महिंद्रा यांना केलं व्यथित!
पाकिस्तानात चाललंय काय? मोहम्मद हाफिजचा कोरोना रिपोर्ट 72 तासांत पॉझिटिव्ह-निगेटिव्ह-पॉझिटिव्ह
अजिंक्य रहाणेकडून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचं कौतुक; म्हणाला...
1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळायचे इतके मानधन; Viral Photo पाहून विश्वास बसणार नाही
Video Viral : शोएब मलिक पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत करत होता फ्लर्ट; सानिया मिर्झा म्हणाली...
प्यार वाली Love Story: रॉबिन उथप्पाला दोन वेळा करावं लागलं होतं लग्न!