कोलंबो - भारताच्या 19 वर्षांखालील संघातून पदार्पण करताना अर्जुन तेंडुलकरने पहिल्याच लढतीत बाराव्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. पण, भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या मुलाला फलंदाजीत प्रभाव पाडता आला नाही. 12व्या चेंडूवर पहिली विकेट घेणा-या अर्जुनने फलंदाजी करताना 11व्या चेंडूवर विकेट फेकली. भोपळाही न फोडता तो माघारी परतला. पी. दुलशानच्या गोलंदाजीवर पासींदू सुरीयाबंदराच्या हाती झेल देत अर्जुन शुन्यावर माघारी फिरला.
अर्जुनने श्रीलंकेच्या पहिल्या डावात 11 षटकांत 2 निर्धाव 33 धावा देत 1 बळी टिपला होता. भारताकडून हर्ष त्यागी आणि आयुष बदोनी यांनी सर्वाधिक प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या होत्या. श्रीलंकेच्या पहिल्या डावातील 244 धावांच्या प्रत्युत्तरात भारताने 589 धावांचा डोंगर उभा केला आहे. त्यात आयुषच्या नाबाद 185, तर अथर्व तायडेच्या 113 धावांच्या खेळीचा सिंहाचा वाटा आहे. भारताने 345 धावांची आघाडी घेतली आहे.
Web Title: Arjun Tendulkar dismissed for duck in maiden innings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.