Arjun Tendulkar flop | अर्जून तेंडुलकरचा 'फ्लॉप शो'... ना बॅटने केली धुलाई, ना गोलंदाजीची चालली जादू

अर्जुन तेंडुलकरला मुंबईचा संघ सोडून गोव्याकडून खेळत आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 08:32 PM2022-12-30T20:32:09+5:302022-12-30T20:32:33+5:30

whatsapp join usJoin us
Arjun Tendulkar flop show in Ranji Trophy 2022 Goa vs Karnataka got out on duck gets only 2 wickets | Arjun Tendulkar flop | अर्जून तेंडुलकरचा 'फ्लॉप शो'... ना बॅटने केली धुलाई, ना गोलंदाजीची चालली जादू

Arjun Tendulkar flop | अर्जून तेंडुलकरचा 'फ्लॉप शो'... ना बॅटने केली धुलाई, ना गोलंदाजीची चालली जादू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Arjun Tendulkar flop, Ranji Trophy: देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेत 'क' गटाच्या सामन्यात मनीष पांडेच्या दमदार खेळीनंतरही कर्नाटकला गोव्यावर विजय मिळवता आता नाही. रणजी करंडक स्पर्धेत फॉलोऑन खेळूनही गोव्याने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. मनीष पांडेने पहिल्या डावात २०८ धावा केल्या. कर्नाटकने पहिला डाव सात गडी गमावून ६०३ धावांवर घोषित केला. गोवा संघ पहिल्या डावात ३७३ धावांत गारद झाला होता. त्यानंतर कर्नाटकने गोव्याला फॉलो-ऑन दिला, पण सामन्याच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी गोव्याने तीन गडी गमावून १५० धावा करून सामना अनिर्णित राखला.

गोव्याचा हा सलग तिसरा सामना अनिर्णित राहिला. याआधी गोव्याचा राजस्थान विरुद्धचा सामना अनिर्णित राहिला होता. यानंतर गोव्याचा झारखंड विरुद्धचा सामनाही अनिर्णित राहिला आणि कर्नाटक विरुद्धचा सामनाही अनिर्णित ठेवण्यात गोव्याला संघाला यश आले.

अर्जुन तेंडुलकर ठरला फ्लॉप

जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन या हंगामात मुंबई सोडून गोव्यात दाखल झाला आहे. त्याने सुरूवातीला दमदार शतक ठोकले. पण कर्नाटतृक विरूद्धच्या सामन्यात अर्जुनला विशेष काही करता आले नाही. त्याने पहिल्या डावात 26.2 षटकात दोन बळी घेतले. अर्जुनला पहिल्या डावात खातंही उघडता आलं नाही. तो शून्यावर बाद झाला. दुसऱ्या डावात तर अर्जुनला फलंदाजीची संधीच मिळू शकली नाही.

गोव्यासाठी कर्णधार दर्शन मिसाळने पहिल्या डावात सर्वाधिक ९५ धावा केल्या. या खेळीत त्याने १७२ चेंडू खेळले आणि १५ चौकार आणि एक षटकार लगावला. त्याच्याशिवाय सुयश प्रभुदेसाईने ८७ धावा केल्या. या खेळीत त्याने १६५ चेंडू खेळताना १२ चौकार मारले. सिद्धेश लाडने ८४ चेंडूत ६३ धावा केल्या. त्याने १० चौकार आणि १ षटकार मारला. दुसऱ्या डावातही सुयश चमकला. त्याने ९५ चेंडूंचा सामना करत नाबाद ६१ धावा केल्या.

कर्नाटकला मोठी धावसंख्या गाठण्यात मदत करण्यात केवळ मनीष पांडेचाच हात नव्हता. रविकुमार समर्थने त्याला मोलाची साथ दिली. रविकुमारने २३८ चेंडूंचा सामना करत १४ चौकारांच्या मदतीने १४० धावा केल्या. कर्णधार मयांक अग्रवालने ५० धावांची खेळी केली. विशाल ओंटने ९१ धावा केल्या. शुभांग हेगडेने ६७ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांसह ३९ धावा केल्या.

Web Title: Arjun Tendulkar flop show in Ranji Trophy 2022 Goa vs Karnataka got out on duck gets only 2 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.