मुंबई : मुंबई ट्वेंटी-20 लीगमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरची चांगलीच धुलाई झाली. आकाश टायगर्स एमडब्लूएस संघाचे प्रतिनिधित्व करताना अर्जुनला सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही. सोबो सुपर सॉनिकच्या फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीवर खोऱ्याने धावा केल्या.
सुपर सॉनिकने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 143 धावा केल्या. कर्णधार जय गोकुळ बिस्त आणि हर्ष टांक यांनी पहिल्या विकेटसाठी 32 धावा केल्या. बिस्तने 13, तर हर्षने 23 धावा केल्या. हे दोघेही फलंदाज बाद झाल्यानंतर सुपर सॉनिकचा डाव गडगडायला सुरुवात झाला. पराग खानपुरकर ( 45) आणि खेजेर दाफेदार ( 33*) यांनी संघाला समाधानकारक धावसंख्या उभारली.
आकाश संघाच्या नेहाल काटकधोंडने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. धवन कुलकर्णी, सिलवेस्टर डिसूजा व सलमान खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अर्जुनला मात्र विकेट घेण्यात अपयश आले. त्याने या सामन्यात एकमेव षटक टाकले आणि त्यात त्याने 16 धावा दिल्या. त्यामुळे त्याला पुन्हा गोलंदाजी देण्याचं धाडस कर्णधाराला झाले नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या अर्जुनने फटकेबाजी करून आश्वासन सुरुवात करून दिली. परंतु 8 चेंडूंत दोन षटकार खेचत 13 धावा करून तो माघारी परतला. आकाश संघाला 7 बाद 133 धावा करता आल्या. कौस्तुभ पवार ( 22), आकर्षित गोमेल ( 43) हे वगळता आकाशच्या एकाही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही.