Join us  

IPL Auction 2021 : लिलावाचा शेवट अर्जुन तेंडुलकरनं, एकमेव मुंबई इंडियन्सनं लावली बोली!

Arjun Tendulkar Mumbai Indians IPL 2021 Auction : मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 स्पर्धेतून मुंबईच्या सीनिअर संघात पदार्पण करत अर्जुननं स्वतःसाठी आयपीएलचे दार उघडले.

By स्वदेश घाणेकर | Published: February 18, 2021 8:21 PM

Open in App

IPL Auction 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वासाठी झालेल्या लिलावाचा शेवट अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याच्या नावानं झाला. मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 स्पर्धेतून मुंबईच्या सीनिअर संघात पदार्पण करत अर्जुननं स्वतःसाठी आयपीएलचे दार उघडले. २० लाखांच्या मुळ किमतीत त्याला स्थान मिळाले होते, परंतु अनकॅप खेळाडूंची नावं घेताना अर्जुनचं नाव न आल्यानं सर्वांना आश्चर्य वाटले. मात्र, लिलावाचा शेवट होताना अखेरचं नाव अर्जुनचं आलं आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) या एकमेव संघानं त्याच्यासाठी बोली लावली. २० लाख मुळ किमतीत अर्जुन मुंबई इंडियन्सचा सदस्य झाला. ( Arjun Tendulkar goes to Mumbai Indians )अर्जुनची अष्टपैलू कामगिरी

मुंबईत सुरू असलेल्या पोलिस ढाल क्रिकेट स्पर्धेत ( Police Shield Cricket Tournament ) अर्जुन एमआयजी क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एमआयजी संघानं मोठा विजय मिळवला.  रविवारी झालेल्या या सामन्यात अर्जुननं २६ चेंडूंत ७७ धावा चोपल्या आणि त्यात ८ षटकार व ५ चौकारांचा समावेश होता. २१ वर्षीय अर्जुननं गोलंदाजीतही कमाल दाखवली आणि ४० धावा देत ३ विकेट्सही घेतल्या.  

४५-४५ षटकांच्या या सामन्यात एमआयजी क्लबनं इस्लाम जिमखान्यावर विजय मिळवला. नाणेफेक जिंकून एमआयजी क्लबने प्रथम फलंदाजीची निर्णय घेतला. कर्णधार केव्हीन डी'अल्मेडानं ९३ चेंडूंत ९६ धावा चोपल्या, तर प्रग्नेश  कानपिल्लेवर यानं खणखणीत शतक झळकावलं. अर्जुननं स्फोटक फलंदाजी करताना संघाला ४५ षटकांत ७ बाद ३८५ धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात इस्लाम जिमखाना संघाला ४१.४ षटकांत सर्वबाद १९१ धावा करता आल्या.  

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२१ मिनी ऑक्शनसचिन तेंडुलकरअर्जुन तेंडुलकरमुंबई इंडियन्स