Arjun Tendulkar IPL 2022: मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) अर्जुन तेंडुलकरला संधी देणार कधी?; हा आता जागतिक प्रश्न झाला आहे. पाच वेळा जेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्सचा ( MI) संघ इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधून बाद होणारा पहिला संघ ठरला... १३ सामन्यांत १० पराभवांसह MI गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर आहे. आता स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे, किमान अर्जुनला आता तरी संधी द्या, अशी मागणी कधीपासून जोर धरतेय.. पण, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ त्याला काही संधी देताना दिसत नाही. अर्जुनच्या मागून संघात बदली खेळाडू म्हणून आलेल्या कुमार कार्तिकेय, त्रिस्तान स्तुब्ब्स यांनी पदार्पण केले. हृतिक शोकिन यालाही संधी मिळाली, परंतु अर्जुन अजून नेट्समध्ये गोलंदाजी करतोय... मुंबईने गुरूवारी अर्जुनचा आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यावर याला खेळवणार की फक्त व्हिडीओ बनवणार? असा सवाल नेटिझन्सनी केला.
आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. गुजरात टायटन्सनेही अर्जुनला २० लाखांच्या मूळ किमतीसह विकत घेण्याची तयारी दर्शवली होती, पण अंतिम बाजी मुंबई इंडियन्सने मारली. अर्जुन तेंडुलकर गेल्या हंगामातही 'मुंबई इंडियन्स'चा भाग होता, पण IPL च्या त्या हंगामातदेखील तो एकही सामना खेळू शकला नाही. रोहित शर्माने मागील लढतीत अखेरच्या साखळी सामन्यात काही नव्या चेहऱ्यांना संधी देणार असे विधान केले होते, पण अर्जुनला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.
मुंबई इंडियन्सने याआधी पोस्ट केलेले व्हिडीओ...