Nepotism : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून खेळणार? नेटिझन्सनं पुन्हा सचिन तेंडुलकरवर केली टीका

चेन्नईत १८ फेब्रुवारीलाहोणाऱ्या आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनसाठी ( IPL 2021 Mini Auction) एकूण १०९७ खेळाडूंनी ( ८१४ भारतीय व २८३ विदेशी) या लिलावासाठी नाव नोंदणी केली आहे.  

By स्वदेश घाणेकर | Published: February 6, 2021 02:00 PM2021-02-06T14:00:17+5:302021-02-06T14:01:56+5:30

whatsapp join usJoin us
Arjun Tendulkar for Mumbai Indians in 2021 IPL? Netizens slam Sachin Tendulkar for promoting nepotism | Nepotism : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून खेळणार? नेटिझन्सनं पुन्हा सचिन तेंडुलकरवर केली टीका

Nepotism : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून खेळणार? नेटिझन्सनं पुन्हा सचिन तेंडुलकरवर केली टीका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नईत १८ फेब्रुवारीलाहोणाऱ्या आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनसाठी ( IPL 2021 Mini Auction) एकूण १०९७ खेळाडूंनी ( ८१४ भारतीय व २८३ विदेशी) या लिलावासाठी नाव नोंदणी केली आहे.  महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) यानंही लिलावासाठी नाव नोंदवलं आहे. पण, अर्जुननं नाव नोंदवल्यामुळे तेंडुलकरवर पुन्हा नेपोटिझमची ( Nepotism) टीका होऊ लागली आहे. 

अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएल लिलावासाठी उपलब्ध असणार आहे. अर्जुन तेंडुलकरची बेस प्राइस २० लाख रुपये इतकी असणार आहे. १८ फेब्रुवारीला यंदाच्या आयपीएलसाठी लिलाव होणार आहे. डावखुऱा जलदगती गोलंदाज अर्जुननं मागील महिन्यात मुंबईच्या सीनिअर संघात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 लीगमधून पदार्पण केलं. त्यात त्यानं दोन सामन्यांत दोन विकेट्स घेतल्या. पुद्दुचेरी संघाविरुद्ध त्यानं चार षटकांत ३३ धावा देताना दोन विकेट्स घेतल्या आणि एका सामन्यात ३ षटकांत ३४ धावांत १ विकेट घेतली.   मुंबईच्या सीनियर संघाकडून पदार्पण करताच अर्जुन आयपीएल ऑक्शनसाठी पात्र ठरला. 




Web Title: Arjun Tendulkar for Mumbai Indians in 2021 IPL? Netizens slam Sachin Tendulkar for promoting nepotism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.