मुंबई : महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा आगामी व्हिज्जी चषक स्पर्धेसाठी मुंबईच्या 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. 22 ऑगस्टपासून आंध्रप्रदेश येथे या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 50 षटकांच्या या स्पर्धेसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने मंगळवारी संघ जाहीर केला. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई ट्वेंटी-20 लीगमध्ये अर्जुनला 5 लाखांची बोली लावली होती.
मुंबईचा संघ - हार्दिक तामोरे ( कर्णधार), श्रुजन आठवले, रुद्रा धांडे, चिन्मय सुतार, आशय सरदेसाई, साईराज पाटील, ओंकार जाधव, सत्यलक्ष जैन, मिनाद मांजरेकर, अर्जुन तेंडुलकर, अमन शेरॉन, अथर्व पूजारी, मॅक्सवेल स्वामिनाथन, प्रशांत सोळंकी, विघ्नेष सोळंकी.
अर्जुन तेंडुलकरच्या वेगानं इंग्लंडमध्ये उडाली खळबळ, व्हिडीओ व्हायरल
अर्जुनने काऊंटी क्रिकेटमध्ये आपल्या चांगल्या कामगिरीनं स्वतः सिद्ध केले. भारतीय अंडर-19 संघाचा डावखुरा गोलंदाज अर्जुन इंग्लंडमधल्या एमसीसी यंग क्रिकेटर्सकडून खेळत होता. त्यानं वेगवान गोलंदाजीच्या जोरावर एका फलंदाजाला क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर सर्वच स्तरावरून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.
सरेनं पहिल्यांदा टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील दुसऱ्या षटकाची अर्जुनला संधी मिळाली. अर्जुननं दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर समोरच्या फलंदाजाचा त्रिफळा उडवला. फलंदाजाला बचावाची संधी न देता त्यानं फलंदाजाची मधलीच दांडी गुल केली. अर्जुननं हा चेंडू वेगानं टाकला होता. अर्जुन तेंडुलकराच्या या शानदार चेंडूला लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडनं शेअर केला आणि तो वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला.
मुंबई T20 लीगमध्ये अर्जुन तेंडुलकरसाठी 5 लाखांची बोली, खेळणार 'या' संघाकडून
अर्जुन पुन्हा चर्चेत आला आहे. मागील अनेक वर्ष कामगिरीत सुधारणा होण्यासाठी अर्जुन झटत आहे. त्याच्या या मेहनतीचं फळ त्याला मिळालं. मुंबई ट्वेंटी-20 लीगसाठी झालेल्या लिलावात अर्जुनला आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी अनेक संघांमध्ये चुरस रंगली, परंतु त्याला आकाश टायगर्स MWS संघाने चमूत घेतले. अर्जुनसाठी आकाश टायगर्स संघाने 5 लाख रुपये मोजले.
Web Title: Arjun Tendulkar named in 15-man Mumbai squad for Vizzy Trophy beginning on 22 August
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.