नवी दिल्ली : सध्या विजय हजारे ट्रॉफी 2022 चा थरार रंगला आहे. भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या खूप चर्चेत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये अर्जुनने चमकदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे, केवळ चेंडूनेच नाही तर बॅटनेही अर्जुन वेळोवेळी संघासाठी शानदार खेळी करत आहे. गोव्याकडून खेळताना अर्जुन तेंडुलकरने हरियाणाविरुद्ध केवळ दमदार गोलंदाजीच केली नाही, तर दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ताबडतोब फटकेबाजी देखील केली.
अर्जुन तेंडुलकरने 4 षटकांत 22 धावा देऊन 1 बळी पटकावला. यादरम्यान त्याची सरासरी केवळ 5.50 अशी होती. लक्षणीय बाब म्हणजे अर्जुनने एक मेडन षटक देखील टाकले. याशिवाय संघाला फलंदाजीत त्याची गरज असताना 10व्या क्रमांकावर खेळताना त्याने अवघ्या 6 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 14 धावा केल्या.
अर्जुन खेळणार पदार्पणाचा सामना?
अर्जुन तेंडुलकरची विजय हजारे ट्रॉफीमध्ये आतापर्यंतची कामगिरी शानदार राहिली आहे. या स्पर्धेत अर्जुनने सात सामन्यांत 4.98 च्या सरासरीसह 8 बळी घेतले आहेत. खरं तर अर्जुन तेंडुलकरची जमेजी बाजू म्हणजे गोलंदाजी. पण त्याची फलंदाजी करण्याची क्षमता देखील सर्वांचे लक्ष वेधत आहे. त्यामुळे आगामी आयपीएल हंगामात तो पदार्पणाचा सामना खेळणार का हे पाहण्याजोगे असेल.
मुंबईच्या फ्रँचायझीने केले रिटेन
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील अर्जुन तेंडुलकरच्या कामगिरीवर भाष्य करायचे झाले तर, त्याने 9 सामन्यात 6.60 च्या सरासरीनुसार 12 बळी घेतले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने आगामी हंगामासाठी अर्जुनला संघात कायम ठेवले आहे. आयपीएल मेगा लिलावात अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपयांना विकत घेतले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Arjun Tendulkar played for Goa in the Vijay Hazare Trophy against Haryana with a strike rate of 233.33
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.