Join us

अर्जुन तेंडुलकरनं गाठला खास पल्ला; व्हाइट बॉल क्रिकेट करिअरमध्ये पार केला 'फिफ्टी'चा आकडा

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अर्जुन तेंडुलरनं गाठलेल्या खास पल्ल्यासंदर्भातील स्टोरी अन् त्याचा व्हाइट बॉल क्रिकेटमधील रेकॉर्ड्सबद्दलची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 17:24 IST

Open in App

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसत आहे. ओडिशा विरुद्धच्या पहिल्या सामन्यात लक्षवेधी कामगिरी करत त्याने ३ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले. अर्जुन तेंडुलकरनं आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून देत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याशिवाय त्याने खास टप्पाही पार केला आहे. जाणून घेऊयात विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अर्जुन तेंडुलरनं गाठलेल्या खास पल्ल्यासंदर्भातील स्टोरी अन् त्याचा व्हाइट बॉल क्रिकेटमधील रेकॉर्ड्सबद्दलची माहिती

दुसऱ्या सामन्यात विकेटच नाही मिळाली, पण त्याआधी गाठला खास पल्ला

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील ओडिशा विरुद्धच्या पहिल्या सामन्यात तीन विकेट्स घेणाऱ्या अर्जुन तेंडुलकरच्या संघानं या स्पर्धेत हरयाणाविरुद्ध दुसरा सामना खेळला. या सामन्यात अर्जुननं पाच षटके गोलंदाजी केली. त्यात १ निर्धाव षटकासह त्याने ३५ धावा खर्च केल्या. पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. दुसऱ्या सामन्यात त्याला विकेट मिळाली नसली तरी पहिल्या सामन्यातील कमागिरीतच त्याने व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये ५० विकेट्सचा टप्पा गाठला आहे. 

अर्जुन तेंडुलकरची आतापर्यंतची कामगिरी

२०२१ मध्ये अर्जुन तेंडुलकरनं टी२० क्रिकेटमधून व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने ४१ सामन्यात ५१ विकेट्स घेतल्या आहेत. डाव्या हाताने जलदगती गोलंदाजी करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरनं १७ लिस्ट ए सामन्यात २४ विकेट्स मिळवल्या असून टी-२० सामन्यात त्याच्या खात्यात २७ विकेट्सची नोंद आहे. लिस्ट ए आणि टी-२० क्रिकेट फॉर्मेटमध्ये त्याच्या नावे चार-चार विकेट्स घेण्याचा पराक्रमही नोंदवला आहे. अर्जुन तेंडुलकरनं  १७ प्रथम श्रेणी सामन्यात ३७ विकेट्स आणि ५३२ धावा केल्या आहेत. यात रणजी करंडक स्पर्धेत  एका सामन्यात पाच बळी मिळवण्याच्या कामगिरीचाही समावेश आहे.

अर्जुन तेंडुलकर मिळालेल्या बूस्टचा फायदा उठवत मोठा ब्लास्ट करण्यात यशस्वी ठरणार का?

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील उर्वरित सामन्यात कामगिरीतील सातत्य कायम राखून तो आपल्यातील क्षमता सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असेल. व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये ५० विकेट्सचा टप्पा पार केल्यावर तो आणखी आत्मविश्वासाने गोलंदाजी करेल, अशी अपेक्षा आहे. या बूस्टचा तो पुरेपूर फायदा उठवणार का? विजय हजारे स्पर्धेत तो किती विकेट्स आपल्या खात्यात जमा करणार ते पाहण्याजोगे असेल. 

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरविजय हजारे करंडकसचिन तेंडुलकर