रणजी करंडक स्पर्धेत गोव्याच्या संघाकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरनं भेदक माऱ्यासह सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली आहे. अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात गोवा संघानं मजबूत पकड मिळवलीये. यात अर्जुन तेंडुलकरनं मोलाचा वाटा उचलल्याचे पाहायला मिळाले. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम करुन दाखवला. रणजी स्पर्धेतील सामन्यात त्याने केलेला धमाका मेगा लिलावात त्याच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.
अर्जुन तेंडुलकरला ताफ्यात घेण्यासाठी MI शिवाय अन्य फ्रँचायझीही रस दाखवतील?
इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ च्या हंगामासाठी या महिन्यातच मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या मेगा लिलावाआधी अर्जुन तेंडुलकरनं फ्रँचायझी मालकांच्या नजरेत भरणारी कामगिरी करून दाखवलीये. अर्जुन तेंडुलकर आयपीएल २०२४ च्या हंगामापर्यंत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसला होता. काही सामन्यात त्याला संधी मिळाली. पण त्याच्या गोलंदाजीत परिपक्वतेचा अभाव दिसून आला. पण आता तो पहिल्यापेक्षा कमालीची गोलंदाजी करत आहे. त्यामुळेच मुंबई इंडियन्सशिवाय अन्य फ्रँचायझी संघही या अनकॅप्ड खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी पॅडल उचलताना पाहायला मिळू शकते.
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येली सर्वोत्तम कामगिरी
रणजी ट्रॉफी प्लेट लीग मॅचमध्ये गोवा संघानं अरुणाचल प्रदेशच्या संघाला अवघ्या ८४ धावांत आटोपले. बॉलिंग ऑलराउंडर अर्जुन तेंडुलकरनं या सामन्यात ९ षटकात २५ धावा खर्च करत ५ विकेट्स घेतल्या. अर्जुन तेंडुलकरची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी १६ सामन्यात त्याने ३२ विकेट्स घेतल्या होत्या. ज्यात ४९ धावा खर्च करून ४ विकेट्स हीत्याची सर्वोत्तम कामगिरी होती. पहिल्या फाइव्ह विकेट्स हॉलसह त्याने आपला वैयक्तिक रेकॉर्डमध्ये सुधारणा केल्याचे दिसून आले.
आयपीएल कारकिर्द अन् रेकॉर्ड
२०२१ च्या हंगामापासून अर्जुन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळताना दिसले. पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघानं त्याच्यासाठी २० लाख रुपये मोजले होते. त्यानंतर २०२२ ते २०२४ पर्यंतच्या हंगामात अर्जुन तेंडुलकरची सॅलरी ही ३० लाख रुपयांच्या घरात पोहचली होती. यावेळी हा आकडा पार करून तो कोट्यवधीत खेळणार की, लाखभर रुपयांच्या पॅकेजवरच त्याला समाधान मानावे लागणार ते पाहण्याजोगे असेल. आयपीएलमध्ये पाच सामन्यात अर्जुन तेंडुल