Sachin Tendulkar Arjun Tendulkar, IPL 2022 MI vs LSG Live: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) च्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माने (Rohit Sharma) मुंबईच्या संघात एक महत्त्वाचा बदल करत वेस्ट इंडिजच्या फॅबियन अलनला (Fabian Allen) संघात स्थान दिले. त्याच्या जागी बेसिल थंपी संघातून बाहेर बसवण्यात आले. त्यासोबतच लखनौ सुपर जायंट्सच्या (Lucknow Super Giants) संघातही एक बदल करण्यात आल्याचे लोकेश राहुलने स्पष्ट केले. कृष्णप्पा गौतमच्या जागी त्यांनी मनिष पांडेला संघात घेतले. या सामन्या सुरू झाल्यावर साऱ्यांचे लक्ष मैदानावर काय घडते, याकडे होतेच. पण त्यासोबत मुंबईचा मेंटॉर सचिन तेंडुलकर आणि त्याचा मुलगा व MI चा सदस्य अर्जुन तेंडुलकर यांच्या खास संवादानेही साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
मुंबईच्या डग आऊटमध्ये सचिन तेंडुलकर, जहीर खान आणि इतर कोचिंग स्टाफ कायमच एकत्र बसलेला दिसतो. मात्र आज सचिनच्या शेजारी त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर बसलेला दिसला. अर्जुनला अद्याप संघात खेळायची संधी मिळालेली नाही. पण तो गेल्या वर्षीपासून मुंबईच्या कँपचा भाग असून त्यांच्या तालमीत तयार होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज अर्जुन तेंडुलकर आपले वडिल आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्याकडून क्रिकेट धडे घेताना दिसला. त्यांचा हा फोटो चांगलाच व्हायरलही झाला.
लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (क), क्विंटन डी कॉक (डब्ल्यू), मनीष पांडे, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, दुष्मंथा चमीरा, आवेश खान, रवी बिश्नोई
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (क), इशान किशन (डब्ल्यू), देवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, फॅबियन ऍलन, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स