मुंबई टू गोवा! Arjun Tendulkar ने मुश्ताक अली ट्रॉफीत केलीय हवा, नेटिझन्स खूश

अर्जुन तेंडुलकर मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 03:34 PM2022-10-13T15:34:20+5:302022-10-13T15:36:19+5:30

whatsapp join usJoin us
Arjun Tendulkar took 2 wickets for 20 runs in 4 overs while playing for Goa in the Mushtaq Ali Trophy   | मुंबई टू गोवा! Arjun Tendulkar ने मुश्ताक अली ट्रॉफीत केलीय हवा, नेटिझन्स खूश

मुंबई टू गोवा! Arjun Tendulkar ने मुश्ताक अली ट्रॉफीत केलीय हवा, नेटिझन्स खूश

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : क्रिकेटचा देव म्हटला जाणारा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरबद्दल सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. अलीकडेच अर्जुन तेंडुलकर मुंबई सोडून गोव्यात आला आहे आणि सध्या तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 मध्ये गोव्याकडून खेळताना दिसत आहे. खरं तर तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचा हिस्सा आहे, मात्र अद्याप त्याने पदार्पण केले नाही. गोवा विरुद्ध मणिपूर सामन्यात अर्जुन तेंडुलकरने आपल्या गोलंदाजीने चाहत्यांना प्रभावित केले आहे. 

अर्जुन तेंडुलकरने मणिपूरविरूद्धच्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याने त्याच्या 4 षटकांत केवळ 20 धावा देऊन 2 बळी पटकावले. अर्जुन तेंडुलकरने कर्णजित युमनम आणि प्रफुल्लोमणी सिंग यांना तंबूत पाठवले. तसेच अर्जुन तेंडुलकरच्या चेंडूवर धावा काढण्यात कोणत्याच फलंदाजाला यश आले नाही. 

अर्जुन तेंडुलकरची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील कामगिरी पाहिल्यानंतर चाहते भारतीय संघामध्ये त्याची निवड करण्याची मागणी करत आहेत. एका युजरने लिहिले की, "अर्जुन तेंडुलकर ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे, ते पाहता तो भारतीय संघात येऊ शकतो." आणखी एका युजरने लिहिले की, "अर्जुन तेंडुलकरला भारतीय संघात संधी देण्याची वेळ आली आहे." 


 
अर्जुन आगामी IPL हंगामातून पदार्पण करणार? 

तर इतर नेटकरी देखील अर्जुन तेंडुलकरच्या चमकदार कामगिरीनंतर त्याचे अभिनंदन करत आहेत. अर्जुन तेंडुलकर आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. 23 वर्षीय अर्जुनने अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण केलेले नाही. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या स्पर्धेत गोव्याकडून खेळताना तो आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडेच तो युवराज सिंगचे वडील योगराज सिंगच्या यांच्याकडून गोलंदाजीचे धडे घेत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आगामी आयपीएल हंगामातून तो पदार्पण करणार का हे पाहण्याजोगे असेल. 

 
 

Web Title: Arjun Tendulkar took 2 wickets for 20 runs in 4 overs while playing for Goa in the Mushtaq Ali Trophy  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.