Join us  

अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या 'अंडर-19' संघात निवड; विनू मंकड स्पर्धेत करणार प्रतिनिधित्व

भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुनचा मुंबईच्या 19 वर्षांखालील संघात समावेश करण्यात आला आहे. विनू मंकड स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर करण्यात आला असून या स्पर्धेला 6 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 10:13 AM

Open in App

मुंबई : भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुनचा मुंबईच्या 19 वर्षांखालील संघात समावेश करण्यात आला आहे. विनू मंकड स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर करण्यात आला असून या स्पर्धेला 6 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत अर्जुनचा भारताच्या 19 वर्षांखालील संघात समावेश करण्यात आला होता. चार डावांत त्याला केवळ तीन विकेट घेता आल्या होत्या. 

19 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्याला वन डे मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्याचबरोबर तो 2020च्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतही खेळू शकणार नाही. वयाच्याच कारणामुळे त्याला युवा आशिया चषक स्पर्धेत संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे विनू मंकड स्पर्धेत चांगली कामगिरी करून मुंबईच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

मुंबईचा पहिला सामना 6 ऑक्टोबरला गुजरातविरुद्ध होणार आहे. त्यानंतर बंगाल ( 7 ऑक्टोबर), मध्य प्रदेश ( 9 ऑक्टोबर), कर्नाटक ( 12 ऑक्टोबर), आसाम ( 16 ऑक्टोबर), महाराष्ट्र ( 18 ऑक्टोबर), झारखंड ( 20 ऑक्टोबर) आणि उत्तर प्रदेश (22 ऑक्टोबर) यांच्याबरोबर सामने होतील.

मुंबईचा संघ - वेदांत मुरकर ( कर्णधार), सुवेद पारकर, प्रज्ञेश कानपिल्लेवार, दिव्यांश सक्सेना, सागर छाब्रीया, अक्षत जैन, आर्सलान शेख, हाशीर दाफेदार, वैभव कलमकर, अथर्व अंकोळेकर, आकाश शर्मा, अर्जुन तेंडुलकर, उझैर खान, अथर्व पूजारी, आर्यन बढे. 

टॅग्स :अर्जुन तेंडुलकर