भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील द्विपक्षीय वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पर्थच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून या सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णयघेतला. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात अरुंधती रेड्डीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. या संधीच सोनं करून दाखवत पर्थच्या मैदानात तिने खास विक्रम नोंदवला आहे. भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कधीच घडलं नाही ते अरुंधती रेड्डीनं पर्थच्या मैदानात करून दाखवलं
अरुंधती रेड्डीनं खास क्लबमध्ये मारली एन्ट्री
ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या धावफलकावर बिन बाद ५० धावा असताना भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं चेंडू अरुंधतीच्या हाती सोपवला. गोलंदाजीची संधी मिळताच अरुंधती रेड्डीनं जॉर्जिया वोलच्या रुपात संघाला पहिलं यश मिळून दिलं. एवढ्यावरच ती थांबली नाही तर आघाडीच्या फळीतील चौघींना तिने एका पाठोपाठ तंबूत धाडलं. एका वनडे सामन्यात प्रतिस्पर्धी संघातील आघाडीचे चार बॅटर्संची विकेट घेणारी अरुंधती रेड्डी ही चौथी गोलंदाज ठरलीये.
महिला वनडे इतिहासात आघाडीच्या फळीतील ४ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांची यादी
- मार्सिया लेट्सोलो - विरुद्ध नेदरलँड्स (पोटचेफस्ट्रूम, २०१०)
- कॅथरीन साइव्हर ब्रंट - विरुद्ध भारत (मुंबई, २०१९)
- एलिस पेरी - विरुद्ध इंग्लंड (कँटरबरी, २०१९)
- केट क्रॉस - विरुद्ध भारत (लंडन, २०२२)
- अरुंधती रेड्डी - विरुद्ध ऑस्ट्रेलिया (पर्थ, २०२४)
अरुंधती रेड्डीची कारकिर्द २०१८ मध्ये टी-२० क्रिकेटमधून भारतीय महिला संघात एन्ट्री मारणाऱ्या २७ वर्षीय अरुंधती रेड्डीनं आतापर्यंत ३३ टी-२० सामन्यात २८ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. ५ वनडेत तिच्या खात्यात ८ विकेट्सची नोंद आहे.