लखनौ : रविचंद्रन अश्विन याला तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून लखनौत खेळविण्याचा निर्णय सहज घेता आला असता. मात्र, अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत रविवारी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी डोके खाजविण्याची वेळ आली. सहाव्या स्थानावर फलंदाजीला येणारा तिसरा वेगवान गोलंदाज हार्दिक संघात संतुलन साधतो. धर्मशाला येथे त्याच्या अनुपस्थितीत दोन बदल झाले होते. मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव खेळले. आता खराब फॉर्ममध्ये असलेल्या इंग्लंडविरुद्ध पाच गोलंदाज खेळविण्याचा रोहितचा इरादा आहे. नऊ वेगवेगळ्या स्थळांवर परिस्थितीनुसार तो संघ बदलत राहणार आहे. फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर अश्विन त्याची पसंत असते, तर पाटा खेळपट्टीवर शार्दूलला संधी दिली जाते.
हार्दिकच्या दुखापतीमुळे सूर्यकुमार यादवचा पुढील काही सामन्यांत संघात खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. आता गोलंदाजीत रोहित शर्मासमोर काय काय पर्याय आहेत, यावर संघ व्यवस्थापन विचार करीत आहे. सिराज, जडेजा आणि कुलदीप यांना अंतिम संघात स्थान असेलच; मात्र अश्विन आणि शार्दूल ठाकूर यांनादेखील परिस्थितीनुसार संघात मिळू शकते.
लखनौमध्ये अश्विनला संधी दिली तर दोनच तज्ज्ञ वेगवान गोलंदाज संघात असतील. अर्थात, जसप्रीत बुमराहच्या सोबतीला मोहम्मद सिराज आणि शमी यापैकी एकाला संधी मिळू शकेल. शमीने धर्मशाला येथे अर्धा संघ बाद केला होता.
Web Title: as compared to r ashwin the suryakumar bows to the measure combination changed in hardik pandya absence
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.