Join us  

Jay Shah will be BCCI President? : सौरव गांगुलीचा 'खेला होबे'? जय शाह BCCI चे नवे अध्यक्ष बनणार, १५ संघटनांचा पाठिंबा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( BCCI) बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 11:09 AM

Open in App

Jay Shah could replace Sourav Ganguly as next President - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( BCCI) बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला त्यांच्या घटनेत बदल करणअयाची तसेच विराम काळाची ( Colling-off Period) अट रद्द केल्याने अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शाह यांचे पद कायम राहिले. पण, आता बीसीसीआयची ताजी निवडणूक होणार आहे आणि त्यात अध्यक्षपदी जय शाह विराजमान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बीसीसीआयशी संलग्न असलेल्या १५ राज्य संघटनांचा जय शाह यांना पाठिंबा असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यामुळे गांगुली आयसीसीच्या निवडणूकीत उतरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बीसीसीआयच्या सध्याच्या नियमांनुसार कोणतीही व्यक्ती राष्ट्रीय आणि राज्य मंडळात सलग सहा वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर राहू शकत नाही. त्याला ३ वर्षांच्या विराम काळाचा नियम पाळावा लागत होता. या नियमांनुसार गांगुली आणि शाह यांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपणार होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे शाह आणि गांगुली यांचा 3 वर्षांनी कार्यकाळ वाढला आहे.  खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार, संबंधित उमेदवार राज्य संघटनेत सहा वर्ष अर्थात दोन टर्म सेवा देऊ शकतो आणि नंतर कूलिंग ऑफ कालावधीची आवश्यकता न घेता बीसीसीआय पदाधिकारी होऊ शकतो. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर BCCI वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्याची शक्यता आहे. त्यानुसार यात नव्याने निवडणूका होणार आहेत.

अनेक राज्य संघटनांची या अध्यक्षपदासाठी जय शाह यांना पसंती आहे. कोरोना काळात महाराष्ट्रात आयपीएलचे यशस्वी आयोजन झाले ते शाह यांच्यामुळेच असे अनेकांना वाटते. शिवाय बीसीसीआयने आयपीएल प्रसारण हक्कातून मिळवलेले ४८,३९० कोटी हे शाह यांच्यामुळे शक्य झाल्याचे अनेकांचे मत आहे. त्यामुळेच आता शाह यांना अध्यक्षपदासाठी अनेकांची पसंती आहे. 

''जय शाह यांनी बीसीसीआयचे प्रमुखपद स्वीकारायची हीच योग्य वेळ आहे आणि सर्व संघटना त्यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत,''असे राज्य संघटनेच्या एका सदस्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.   

सौरव गांगुली आयसीसीच्या चेअरमनपदी ...भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आयसीसीच्या चेअरमनपदी दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. ग्रेग बार्क्ले हे पदावरून पायउतार झाल्यास गांगुलीची निवड होऊ शकते. अशात गांगुलीला बीसीसीआयमधील पद सोडावे लागले.    

टॅग्स :सौरभ गांगुलीजय शाहबीसीसीआय
Open in App