Shubhman Gill:"शुबमन गिलच आहे खरा खेळाडू", सारा अली खानला करतोय डेट?, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Shubman Gill Spoted With Sara Ali Khan: भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 01:17 PM2022-08-30T13:17:20+5:302022-08-30T13:17:44+5:30

whatsapp join usJoin us
As soon as a picture of Shubhman Gill and Sara Ali Khan together surfaced, memes are going viral on social media | Shubhman Gill:"शुबमन गिलच आहे खरा खेळाडू", सारा अली खानला करतोय डेट?, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Shubhman Gill:"शुबमन गिलच आहे खरा खेळाडू", सारा अली खानला करतोय डेट?, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (Shubhman Gill) सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. मात्र आशिया चषकाच्या (Asia Cup 2022) संघातून त्याला वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे अलीकडेच पार पडलेल्या झिम्बाब्वेविरूद्धच्या मालिकेत त्याने शानदार शतक ठोकले होते. उल्लेखणीय कामगिरीच्या जोरावर मालिकावीर पुरस्कार देऊन त्याला गौरविण्यात आले होते. आता शुबमन गिलची खरी कसोटी इंग्लंडच्या (England) धरतीवर असणार आहे. काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी शुबमन सध्या इंग्लंडमध्ये आहे. 

दरम्यान, सध्या शुबमन गिलचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शुभमन गिल एका मिस्ट्री गर्लसह लंडनमधील रेस्टॉरंटमध्ये डेटवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. नेटिझन्सच्या म्हणण्यानुसार ती मिस्ट्री गर्ल बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आहे. मीडिया रिपोर्टनुसर शुबमन गिल लंडनमध्ये बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानसोबत पाहायला मिळाला. एका रेस्टॉरंटमध्ये दोघे एकत्र दिसले. गिलसोबत असलेली व्यक्ती सारा तेंडुलकर असल्याचा अंदाज सर्व व्यक्त करत होते. मात्र शुबमनसोबत असलेल्या व्यक्तीचे नाव सारा असल्याचं वृत्त समोर आले. पण ही सारा सचिन तेंडुलकर यांच्या कन्या नसून बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान असल्याचे सांगण्यात येत आहे.

सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्यात अफेयर असल्याच्या चर्चा असतानाच हा फोटो व्हायरल होत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी देखील याचा चांगलाच समाचार घेऊन भन्नाट मीम्स व्हायरल करायला सुरूवात केली आहे. 

Web Title: As soon as a picture of Shubhman Gill and Sara Ali Khan together surfaced, memes are going viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.