Asia Cup 2022:भारतीय संघाची घोषणा होताच पाकिस्तानमध्ये खळबळ; पाकला सतावतेय 'ही' भीती

आशिया चषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 11:09 AM2022-08-09T11:09:51+5:302022-08-09T11:15:35+5:30

whatsapp join usJoin us
As soon as the Indian team for the Asia Cup 2022 is announced, reactions from Pakistan have started coming | Asia Cup 2022:भारतीय संघाची घोषणा होताच पाकिस्तानमध्ये खळबळ; पाकला सतावतेय 'ही' भीती

Asia Cup 2022:भारतीय संघाची घोषणा होताच पाकिस्तानमध्ये खळबळ; पाकला सतावतेय 'ही' भीती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघ २८ ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध मैदानात उतरेल. टी-२० विश्वचषकात मिळालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. तर पुन्हा एकदा विजय मिळवून जगाला धक्का देण्याच्या तयारीत पाकिस्तानचा संघ असेल. या बहुचर्चित स्पर्धेसाठी दोन्ही देशातील संघाची घोषणा झाली आहे. या स्पर्धेसाठी भारताने ४ फिरकीपटूंना संधी दिली असून ही स्पर्धा दुबईत पार पडणार आहे. 

पाकिस्तानला भारतीय फिरकीची चिंता
पाकिस्तानच्या संघाची कमजोर बाजू पाहता भारतीय संघात ४ फिरकीपटूंचा समावेश केल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानच्या संघात बाबर आझम, शादाब खान आणि मोहम्मद रिझवान यांना वगळले तर कोणताच विश्वासू फलंदाज पाकिस्तानच्या संघात नाही, जो फिरकी गोलंदाजीचा सामना करू शकतो. याच भीतीमुळे पाकिस्तानचे चाहते ट्विटवर सतत भारतीय संघावर प्रतिक्रिया देत आहेत. पाकिस्तानी चाहत्यांच्या म्हणण्यानुसार पाकच्या संघाला भारतीय फिरकीपासून सावध राहणे गरजेचे आहे.

 

आशिया चषकात भारत विरूद्ध पाकिस्तान

  1. १९८४ -  ५४ धावांनी भारत विजयी 
  2. १९८८ -  ४ गडी राखून भारत विजयी 
  3. १९९५ -  ९७ धावांनी पाकिस्तान विजयी
  4. १९९७ - पावसामुळे सामना रद्द
  5. २००० - पाकिस्तानचा ४४ धावांनी विजय 
  6. २००४ - ५९ धावांनी पाकिस्तान विजयी
  7. २००८ - सुपर ४ टप्प्यात पाकिस्तानने भारताचा पराभव करण्याआधी ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. 
  8. २०१० - ३ गडी राखून भारताचा विजय
  9. २०१२ - ६ गडी राखून भारताचा विजय
  10. २०१४ - १ गडी राखून पाकिस्तानचा विजय
  11. २०१६ - ५ गडी राखून भारताचा विजय
  12. २०१८ - ९ गडी राखून भारताचा विजय

 

आशिया चषकासाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूड्डा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, अवेश खान.  

आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ - 
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहिन शाह आफ्रिदी, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर. 


 

Web Title: As soon as the Indian team for the Asia Cup 2022 is announced, reactions from Pakistan have started coming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.