MS Dhoni’s Promotional Advertisement Withdrawn - भारतीय संघाचा व चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आयपीएलच्या नव्या जाहिरातीवरून आडचणीत सापडला आहे. धोनीला घेऊन तयार करण्यात आलेल्या या जाहिरातीवर Advertising Standards Council of India ने आक्षेप घेतला आणि त्यानंतर ही जाहिरात हटवण्यात आली आहे. आयपीएल २०२२ ला २६ मार्चपासून सुरूवात झाली. लीगची सुरुवात असल्यामुळे जाहिरातीतून जोरदार प्रमोशन केले गेले. पण, ASCIच्या आदेशानंतर ती हटवण्यात आली आहे.
कंझ्यूमर युनिटी अँड ट्रेस सोसायटीने या जाहिरातीविरोधात तक्रार दाखल केली. या जाहिरातीतून वाहतुक नियमांचे उल्लंघन होत असल्याचा त्यांचा आक्षेप होता. ASCI नेही या आक्षेपावर सहमती दर्शवली आणि त्यामुळे ती हटवण्यात आली आहे.
या प्रोमोत धोनी बस चालवताना दिसतोय.. मागे गाड्यांचा ताफा असताना तो अचानक ब्रेक मारून बस थांबवतो आणि त्यानंतर वाहतुक पोलिसही त्याला जाब विचारतात.. मग पुढे काय होतं ते पाहा..
Web Title: ASCI has requested that a promotional advertisement starring Mahendra Singh Dhoni be removed from the Indian Premier League
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.