Join us  

Ashes 2017 : ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय

अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत सामन्यात इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाकडून दणदणीत पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला दुसऱ्या डावात 195 धावांमध्ये बाद केलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 11:48 AM

Open in App

ब्रिस्बेन - अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत सामन्यात इंग्लंडचाऑस्ट्रेलियाकडून दणदणीत पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला दुसऱ्या डावात 195 धावांमध्ये बाद केलं होतं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 170 धावांचे लक्ष्य मिळाले होतं. ऑस्ट्रेलियानं हे अवाहन चौथ्या दिवशी एकही विकेट न गमावता पार केलं. 

चौथ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियानं नाबाद 114 धावा केल्या होत्या. आज पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियानं 56 धावां करत अशेस मालिकेतील पहिल्या सामन्यावर कब्जा मिळवला. यासह मालिकेत ऑस्ट्रेलियानं 1-0नं आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात सलामिवीर कॅमरोन बॅनक्राफ्ट ने 82 धावांची खेळी केली तर डेविड वॉर्नर ने 87 धावा करत विजयात महत्वपुर्ण योगदान दिलं.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथला सामनावीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 302 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 328 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाला 26 धावांची छोटी आघाडी मिळाली होती. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्मिथने नाबाद (141) धावा फटकावल्या होत्या.  

स्टिव्हन स्मिथने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम स्मिथने सचिनचा कसोटी क्रिकेटमधील वेगवान 21 शतकांचा विक्रम मोडला. स्मिथने  इंग्लंडविरुद्ध 21 वे शतक झळकावले पण त्याने 105 डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली तेच सचिनने 110 डावांमध्ये 21 शतके झळकवली होती. स्मिथचा करीयरमधील हा 57 वा कसोटी सामना आहे.  वेगवान 21 कसोटी शतके झळकवणा-या फलंदाजांमध्ये स्मिथ आता तिस-या आणि सचिन चौथ्या स्थानावर आहे. वेगवाने 21 कसोटी शतके झळकावणा-या खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी फक्त 56 डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली होती. दुस-या स्थानावर भारताचेल लिटील मास्टर सुनिल गावसकर आहेत. त्यांनी 98 कसोटी डावांमध्येच हा टप्पा गाठला होता. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ पाचव्या स्थानावर आहे.

टॅग्स :आॅस्ट्रेलियाइंग्लंडक्रिकेट