लंडन, अॅशेस 2019 : अॅशेस मालिकेच्या पहिल्या सामन्यात स्टीव्हन स्मिथने सलग दोन शतके लगावली आणि इंग्लंडकडून सामना ऑस्ट्रेलियाकडे खेचून आणला. अॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना बुधवारपासून लॉर्ड्सच्या मैदानात होणार आहे. या सामन्यात इंग्लंडच्या रडारवर असेल तो स्मिथ. पण आता स्मिथला रोखण्यासाठी इंग्लंडच्या संघाने एक फंडा वापरण्याचे ठरवले आहे.
अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यावर ऑस्ट्रेलियाने मोहोर उमटवली. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो स्टीव्हन स्मिथ. कारण या सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला नॅथन लिऑनने सहा विकेट्स घेत खिंडार पाडले आणि ऑस्ट्रेलियाने 251 धावांनी हा सामना जिंकला.
इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात काही बदल केले आहेत. स्मिथला रोखण्यासाठी इंग्लंडने आपल्या संघात युवा वेगवान गोलंदाज जेफ्रो आर्चरला संधी दिली आहे. आता आर्चर स्मिथला झटपट बाद करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर
ऑस्ट्रेलियन संघाने अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी 12 सदस्यीय संघ मंगळवारी जाहीर केला. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. त्यामुळे लॉर्ड्स कसोटीतून मालिका बरोबरीत सोडवण्याचा निर्धार यजमान इंग्लंडनेकेला आहे. पण, त्यांच्या या मनसुब्याला धक्का देण्याची तयारी ऑसींनी केली आहे. त्यांनी दुसऱ्या कसोटीसाठी संघात प्रमुख गोलंदाजाला पाचारण केले आहे. ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या संघात मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडला संधी देण्यात आली आहे, तर जेम्स पॅटींसनला डच्चू देण्यात आला आहे.
दुसरा सामना 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या कसोटीसाठी इंग्लंड संघाने 12 सदस्यीय संघ जाहीर केला असून त्यात फिरकीपटून मोईन अलीला डच्चू देण्यात आला आहे. अलीच्या जागी इंग्लंड संघाड डावखुरा फिरकीपटू जॅक लीचचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या कसोटीत अलीला फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही विभागात अपयश आले होते. त्यानं फलंदाजीत 0 व 4 धावा केल्या होत्या, तर गोलंदाजीत दोन्ही डावांत मिळून 42 षटकांत 172 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या.
प्रतिस्पर्धी संघ
ऑस्ट्रेलिया - टीम पेन, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरून बँक्रॉफ्ट, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हीस हेड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, पीटर सिडल, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.
इंग्लंड - जो रूट ( कर्णधार), जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, सॅम कुरन, जोए डेन्ली, जऐक लीच, जेसन रॉय, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स.
Web Title: Ashes 2019: England given chance to jofra archer in 2nd test to stop Steven Smith
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.