Join us  

Ashes 2019 : इंग्लंडला धक्का, प्रमुख गोलंदाजाची मालिकेतूनच माघार

अ‍ॅशेस 2019 : इंग्लंडने अ‍ॅशेस मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवला. बेन स्टोक्सने अखेरच्या विकेटसाठी जॅक लिचला सोबत घेत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 7:02 PM

Open in App

लंडन, अ‍ॅशेस 2019 : इंग्लंडने अ‍ॅशेस मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवला. बेन स्टोक्सने अखेरच्या विकेटसाठी जॅक लिचला सोबत घेत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1- 1 अशी बरोबरी केली आहे. या विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेला इंग्लंडचा संघ मालिकेत आघाडी घेण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, चौथ्या सामन्यापूर्वी त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या प्रमुख गोलंदाजानं उर्वरित अ‍ॅशेस मालिकेतूनच माघार घेतली आहे.  तिसऱ्या कसोटीत कांगारुंच्या 359 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे 9 फलंदाज 286 धावांत माघारी परतले होते. स्टोक्सने दहाव्या विकेटसाठी लिचसह नाबाद 76 धावांची भागीदारी केली. त्यात लिचची एक धाव होती, तर स्टोक्सच्या 74 धावा होत्या. स्टोक्सने शतकी झुंज देत नाबाद 135  धावा केल्या आणि ऑस्ट्रेलिच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणत सामना 1 विकेट्सने जिंकला. या विजयामुळे इंग्लंड संघाचे मनोबल चांगलेच उंचावले आहे. पण, त्यांना एक धक्का बसला आहे. अ‍ॅशेस मालिकेतील चौथा सामना 4 सप्टेंबरपासून मँचेस्टर येथे खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज जेम्स अँडरसन दुखापतीतून सावरला नाही, त्यामुळे त्याने मालिकेतूनच माघार घेतली आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात केवळ चार षटकं टाकून अँडरसन मैदनाबाहेर गेला होता. त्याच्या पोटरीला दुखापत झाली होती आणि MRIच्या अहवालात ही दुखापत बरी झाली नसल्याचे उघड झाले. त्यानंतर त्याने तंदुरुस्त होण्यासाठी कसून सराव केला. मात्र, शुक्रवारी झालेल्या वैद्यकीय चाचणीत तो नापास झाला. त्यामुळे इंग्लंडने चौथ्या कसोटीसाठी जाहीर केलेल्या संघात त्याला स्थान देण्यात आलेले नाही. इंग्लंडचा संघ - जो रुट, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, सॅम कुरन, जो डेन्ली, जॅक लिच, क्रेग ओव्हरटन, जेसन रॉय, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स. 

 

टॅग्स :अ‍ॅशेस 2019इंग्लंडआॅस्ट्रेलियाजेम्स अँडरसन