बर्मिंगहम: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरन बॅनक्रॉफ्ट यांनी संधी दिली आहे. यामुळे सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक त्यांना चिडवण्याची संधी सोडताना दिसत नाही.
या सामन्याला पहिल्या दिवसांपासून बर्मिंगहमच्या एजबेस्टन मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी स्मिथ रडतानाचे मुखवटे व टी-शर्ट परिधान करून त्याला चिडवण्याच्या प्रयत्न केला. तसेच डेविड वॅार्नर व बॅनक्रॉफ्ट बाद झाल्यानंतर देखील प्रेक्षकांनी त्यांची सॅण्ड पेपर दाखवून खिल्ली उडवली होती. त्यातच तिसऱ्या दिवशीही डेव्हिड वॉर्नरला प्रेक्षकांनी डिवचण्याचा प्रयत्न केला. वॅार्नर मैदानातील सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना प्रेक्षकांकडून तुझ्या खिशात सॅण्ड पेपर तर नाही ना असा सवाल उपस्थित करण्यात आला. यानंतर वॅार्नरने देखील त्याचे दोन्ही खिशे खाली असल्याचे दाखवत प्रेक्षकांना प्रतिउत्तर देले.
ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर तिसऱ्या दिवस अखेर 34 धावांची आघाडी घेतली आहे. डेविड वॅार्नरला या सामन्यात दुहेरी आकडाही पार करता आला नाही. त्याने पहिल्या इनिंगमध्ये 2 धावा तर दूसऱ्या इनिंगमध्ये 8 धावा केल्या.
अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरन बॅनक्रॉफ्ट यांनी संधी दिली आहे. या तिघांवर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना बॉल टेम्परिंग प्रकरणी बोर्डाने 1 वर्ष निलंबनाची कारवाई केली होती.