Ashes 2021-22, AUS vs ENG: ऑस्ट्रेलियाला सिडनीचं मैदान पाडतंय तोंडघशी! आधी भारतीयांनी रडवलं, आज इंग्लंडने झुंजवलं; अजूनही नशिबी विजय नाहीच

पहिल्या तीनही कसोटी सहज जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला आजची कसोटी काही केल्या जिंकताच आली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 05:49 PM2022-01-09T17:49:15+5:302022-01-09T17:51:06+5:30

whatsapp join usJoin us
Ashes 2021-22 AUS vs ENG Australia struggle in Sydney cricket ground Team India England see stadium record | Ashes 2021-22, AUS vs ENG: ऑस्ट्रेलियाला सिडनीचं मैदान पाडतंय तोंडघशी! आधी भारतीयांनी रडवलं, आज इंग्लंडने झुंजवलं; अजूनही नशिबी विजय नाहीच

Ashes 2021-22, AUS vs ENG: ऑस्ट्रेलियाला सिडनीचं मैदान पाडतंय तोंडघशी! आधी भारतीयांनी रडवलं, आज इंग्लंडने झुंजवलं; अजूनही नशिबी विजय नाहीच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ashes 2021-22, Aus vs Eng: अँशेस मालिकेच्या पहिल्या तीन कसोटीत अतिशय सहज विजय मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाला आज सिडनीच्या मैदानाने पुन्हा एकदा तोंडघशी पाडलं. चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ३८८ धावांचे मोठे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना सामन्यावर त्यांची पकडही होती. पण इंग्लंडच्या तळाच्या दोन फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या तोंडून विजय खेचून आणत सामना अनिर्णित राखला. सिडनीच्या मैदानावर सलग दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ तोंडघशी पडल्याची घटना घडली.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने याआधीचा सामना सिडनीच्या मैदानावर भारताविरूद्ध खेळला होता. गेल्या वर्षी सात जानेवारीला हा कसोटी सामना खेळण्यात आला. त्यातही तसंच घडलं जसं आज इंग्लंडच्या फलंदाजांनी घडवलं. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ४०७ धावांचे तगडे आव्हान दिले होते. इतक्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करणं शक्य नसल्याने भारत हारणार अशीच साऱ्यांची अपेक्षा होती. पण भारताच्या तळाच्या फलंदाजांनी अंगावर चेंडू झेलत ऑस्ट्रेलियाच्या घशातून सामना खेचून अनिर्णित राखण्याच यश मिळवलं होतं.

अश्विन-विहारी जोडीने २५८ चेंडूंचा सामना करत ऑस्ट्रेलियाला रडवलं

भारताला ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ४०७ धावांचे आव्हान दिले होते. या सामन्यात शेवटच्या दिवशी भारताला ३०९ धावांची तर ऑस्ट्रेलियाला ८ गडींची आवश्यकता होती. ऑस्ट्रेलियाने २७२ धावांवर भारताचा निम्मा संघ माघारी धाडला खरा. पण तेथूनच पुढे अश्विन-विहारी जोडीने डाव सावरला. दोघांनी २५८ चेंडूंचा सामना करत नाबाद ६२ धावांची भागीदारी केली आणि सामना अनिर्णित राखला.

Web Title: Ashes 2021-22 AUS vs ENG Australia struggle in Sydney cricket ground Team India England see stadium record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.