Ashes 2021, ENG vs AUS 4th Test: भन्नाट! ऑस्ट्रेलियाने विजयासाठी सारं काही करून पाहिलं, पण इंग्लंडच्या पठ्ठ्याने अखेर लाज राखलीच!!

शेवटच्या चेंडूवर एक विकेट हवी होती. त्यावेळी गोलंदाजाने थेट अंगावरच टाकला चेंडू अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 02:06 PM2022-01-09T14:06:42+5:302022-01-09T14:43:35+5:30

whatsapp join usJoin us
Ashes 2021 England managed to Draw 4th Test at Sydney as match thrilled till last ball | Ashes 2021, ENG vs AUS 4th Test: भन्नाट! ऑस्ट्रेलियाने विजयासाठी सारं काही करून पाहिलं, पण इंग्लंडच्या पठ्ठ्याने अखेर लाज राखलीच!!

Ashes 2021, ENG vs AUS 4th Test: भन्नाट! ऑस्ट्रेलियाने विजयासाठी सारं काही करून पाहिलं, पण इंग्लंडच्या पठ्ठ्याने अखेर लाज राखलीच!!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ashes 2021, ENG vs AUS 4th: पहिल्या तीन सामन्यात अतिशय लाजिरवाणा पराभव स्विकारणाऱ्या इंग्लंडने अखेर चौथा कसोटी सामना अनिर्णित राखला. सिडनीच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला. शेवटच्या एका चेंडूवर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी जेम्स अँडरसनची विकेट हवी होती. पण त्याने शेवटच्या चेंडूपर्यंत आपली विकेट सांभाळली आणि अखेर इंग्लंडने चौथा कसोटी सामना अनिर्णित राखला.

ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात ४०० पार मजल मारली आणि नंतर इंग्लंडला पहिल्या डावात २९४ धावांवर बाद केल्यामुळे त्यांच्याकडे भक्कम आघाडी होती. ती आघाडी आणखी वाढवत त्यांनी दुसरा डाव ६ बाद २६५ वर घोषित केला. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी ३८८ धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी संयमाने संपूर्ण दिवस खेळून काढण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या सत्रात इंग्लंडने १२२ धावांत ३ बळी गमावले. हसीब हमीद आणि डेव्हिड मलान दोन आकडी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. जॅक क्रॉलीने दमदार अर्धशतक ठोकलं पण तो ७७ धावांवर माघारी परतला. दुसऱ्या सत्रात इंग्लंडने केवळ जो रूटची एकमेव विकेट गमावली. पण बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो दोघांनी किल्ला लढवला. तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रात सामना पटकन फिरला. स्टोक्स अर्धशतक ठोकून (६०) आणि बेअरस्टो (४१) अर्धशतकानजीक असताना बाद झाले. भरवशाचा जोश बटलर (११) आणि मार्क वूडही (०) माघारी परतले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या.

ऑस्ट्रेलियाचा 'स्मिथ-स्पेशल' डाव ठरला होता टर्निंग पॉईंट, पण...

जॅक लीच आणि स्टुअर्ट ब्रॉड जोडीने बराच काळ संघर्ष केला. त्यांनी नवव्या विकेटसाठी ३३ धावांची उपयुक्त भागीदारी केली. त्यानंतर सहसा गोलंदाजी न करणाऱ्या स्टीव्ह स्मिथला गोलंदाजीसाठी बोलवण्यात आलं. ऑस्ट्रेलियाचा 'स्मिथ-स्पेशल' य़शस्वी ठरला.  २०१६ नंतर पहिल्यांदा स्मिथला आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात विकेट मिळाली.

इंग्लंडच्या पठ्ठ्याने सोडली नाही जिद्द

लिच बाद झाल्यावर स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन ही शेवटची जोडी मैदानात होती. दोन षटकांचा खेळ शिल्लक होता. त्यावेळी नॅथन लायनच्या षटकाचे सहा चेंडू ब्रॉडने झकासपैकी खेळून काढले. त्यानंतर अखेरचे सहा चेंडू अँडरसनच्या वाट्याला आले. स्टीव्ह स्मिथने त्याला बाद करण्याचा प्रयत्न केला पण अँडरसनने सहाच्या सहा चेंडू संयमाने खेळून काढत सामना अनिर्णित राखला. 

Web Title: Ashes 2021 England managed to Draw 4th Test at Sydney as match thrilled till last ball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.