Join us  

२२ डॉट बॉल्सनंतर २ धावा अन् भन्नाट यॉर्कर; मार्क वूडने उडवला उस्मान ख्वाजाचा दांडा, Video

Ashes 2023 ENG vs AUS 3rd Test : मालिकेत ०-२ अशा पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत चांगली सुरूवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 4:58 PM

Open in App

Ashes 2023 ENG vs AUS 3rd Test : मालिकेत ०-२ अशा पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत चांगली सुरूवात केली आहे. ऑली पोपने दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली, तर जॉश टंग व जिमी अँडरसन यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटीत विश्रांती दिली गेली आहे. इंग्लंडने आजच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल करताना मोईन अली, मार्क वूड व ख्रिस वोक्स यांना संधी दिली आहे. त्याच मार्क वूडने ( Mark Wood) अप्रतिम स्पेल टाकून ऑस्ट्रेलियाची कोंडी केली. १५०+ वेगाने चेंडू टाकणार्या वूडचा सामना करणं कागारूंना अवघड होऊन बसले अन् टेस्ट स्पेशालिस्ट उस्मान ख्वाजाला या वेगासमोर नांगी टाकावी लागली. 

बर्मिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने २ विकेट्सने रोमहर्षक विजय मिळवला. उस्मान ख्वाजाची विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाची कोंडी झाली होती, परंतु कर्णधार पॅट कमिन्सने जबरदस्त खेळ करून इंग्लंडच्या तोंडचा घास पळवला. लॉर्ड्स कसोटीत स्टीव स्मिथ व पॅट कमिन्स यांनी घेतलेले झेल, जॉनी बेअरस्टोची स्टम्पिंग वादात अडकली. कॅमेरून ग्रीनचा बाऊन्सर चकवल्यानंतर बेअरस्टो क्रिज सोडून पुढे गेला अन् यष्टिरक्षक अॅलेक्स केरीने दूरून यष्टींचा वेध घेतला. जोरदार अपील झाले अन् बेअरस्टोला बाद दिले गेले. यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना स्लेज केले. उस्मान ख्वाजा व डेव्हिड वॉर्नर यांच्यासोबत चाहत्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचे दिसले.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. स्टुअर्ट ब्रॉडने पुन्हा एकदा डेव्हिड वॉर्नरला ( ४) आपला शिकार बनवला. ब्रॉडने सर्वाधिक १६ वेळा वॉर्नरची विकेट घेतली. उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच बेन स्टोक्सने चेंडू मार्क वूडच्या हाती दिला. वूडने १५०kmphच्या वेगाने सातत्याने मारा करून दोन्ही फलंदाजांना चकित केले. वूडने पहिल्या स्पेलमधील ४ षटकांत सलग २२ चेंडू डॉट्स ( निर्धाव टाकले.) २३ व्या चेंडूवर ख्वाजाने दोन धावा काढल्या, परंतु पुढच्याच चेंडूवर वूडने यॉर्कवर ख्वाजाचा ( १३) दांडा उडवला. ऑसींचे २ फलंदाज ४२ धावांवर माघारी परतले. 

 

टॅग्स :अ‍ॅशेस 2019इंग्लंडआॅस्ट्रेलियाडेव्हिड वॉर्नरस्टुअर्ट ब्रॉड
Open in App