बर्मिंगहॅम, अॅशेस 2019: स्टीव्ह स्मिथच्या सलग दुसऱ्या शतकानं इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणले आहे. अखेरच्या दिवशी विजयासाठी 385 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या इंग्लंडला अवघ्या काही मिनिटांतच धक्का बसला. लक्ष्याचा पाठलाग करताना रॉरी बर्न्स आणि जेसन रॉय यांनी इंग्लंडच्या डावाची सुरुवात केली. पण, पॅट कमिन्सने बर्न्सला ( 11) बाद करून इंग्लंडला मोठा धक्का दिला. स्वस्तात बाद होऊनही बर्न्सने आपल्या नावावर एक विक्रम नोंदवला. कसोटी क्रिकेटच्या पाचही दिवस फलंदाजी करण्याचा विक्रम त्यानं नावावर केला. असा विक्रम नोंदवणारा तो दहावा फलंदाज ठरला आहे.
स्मिथनंतर वेडनं 143 चेंडूंत 17 चौकारांच्या मदतीनं 110 धावांची खेळी केली. त्याला टीम पेन ( 34), जेम्स पॅटींसन ( 47*) आणि पॅट कमिन्स ( 26*) यांनी साथ देत संघाला 7 बाद 487 धावांपर्यंत मजल मारून दिले. ऑस्ट्रेलियानं डाव घोषित करताना इंग्लंडसमोर विजयासाठी 398 धावांचे लक्ष्य ठेवले. दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद 13 धावा केल्या होत्या.
पाच दिवसांतील बर्न्सची कामगिरीपहिला दिवस - 4 चेंडू नाबाद 4 धावादुसरा दिवस - 278 चेंडू नाबाद 121 धावातिसरा दिवस - 30 चेंडू 8 धावाचौथा दिवस - 21 चेंडू नाबाद 7 धावापाचवा दिवस - 12 चेंडू 4 धावा