लंडन : जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने रविवारी अॅशेस मालिकेतील पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १३५ धावांनी पराभव केला. या विजयामुळे अॅशेस मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या ३९९ धावांचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाचा डाव २६३ धावांत संपुष्टात आला. ब्रॉड व जॅक लिच यांनी चार बळी मिळवले.चहापानाला आॅस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात ५ बाद १६७ अशी अवस्था झाली होती. मॅथ्यू वेडने (११७) शतकी खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसºया बाजूने योग्य साथ न मिळाल्याने आॅस्ट्रेलियाला चौथ्या दिवशीच पराभव पत्करावा लागला. सुरुवातीलाच दिलेल्या दुहेरी धक्क्यामुळे आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव गडगडला. पाचव्या व शेवटच्या कसोटीत रविवारीचौथ्या दिवशी उपहारापर्यंत आॅस्ट्रेलियाचे तीन फलंदाज तंबूत परतले होते.तत्पुर्वी इंग्लंडचा दुसरा डाव ३२९ धावांवर आटोपला. यामुळे आॅस्ट्रेलियाला विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य मिळाले. आॅस्ट्रेलियाचे सलामीवीर पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले.ब्रॉडने मार्कस हॅरिस (९) व डेव्हिड वॉर्नर (११) यांना झटपट बाद केले.दोन बाद २९ धावांवरुन लाबुशेनव स्टिव्ह स्मिथ यांनी डाव सांभाळला. हे दोघे चांगली भागीदारी करतीलअसे वाटत असतानाच नॅथन लियोनच्या चेंडूवर लाबुशेन (१४) बाद झाला.लियोन व सॅम कुरेन यांनी स्मिथ व वेड यांच्यावर चांगलाच दबाव आणला. उपहारानंतर लगेचच स्मिथला (२३) बाद करत ब्रॉडने आॅस्ट्रेलियाला चांगलेच अडचणीत आणले.मॅथ्यू वेडने मिचेश मार्शसमवेत पाचव्या गड्यासाठी ६३ धावांची भागीदारी रचली. मात्र मार्श बाद झाल्यानंतर आॅस्ट्रेलियाचा डाव कोसळला.>संक्षिप्त धावफलकइंग्लंड : २९४ व ३२९ धावाआॅस्ट्रेलिया: प.डाव २२५, दुसरा डाव: सर्व बाद २६३; मॅथ्यू वेड ११७, स्मिथ २३, मार्श २४; स्टुअर्ट ब्रॉड ४/६२, लिच ४/४९
- Cricket Buzz»
- बातम्या»
- अॅशेस मालिका बरोबरीत : इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात
अॅशेस मालिका बरोबरीत : इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात
जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने रविवारी अॅशेस मालिकेतील पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १३५ धावांनी पराभव केला.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 4:19 AM