कोलकाता : आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणारा भारताचा डावखुरा गोलंदाज आशिष नेहरा आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. कोलकाता येथे ईडन गार्डन्सवर उद्यापासून सुरु होत असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका कसोटीत तो समालोचकाच्या भूमिकेत दिसणार आहे. विरेंद्र सेहवागनं आपल्या खास शैलिल ट्विट करत त्याचं स्वागत केलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान आशिष नेहराने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो आता समालोचक म्हणून क्रिकेटशी जोडला जाणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून कोलकात्यातून सुरुवात होत आहे.
या मालिकेतील पहिली कसोटी 16 नोव्हेंबरपासून कोलकात्यात, दुसरी कसोटी 24 नोव्हेंबरपासून नागपुरात आणि तिसरी कसोटी 2 डिसेंबरपासून दिल्लीत खेळवली जाणार आहे.
नेहराचा १८ वर्षांचा रोमांचक प्रवासभारताचा जलदगती गोलंदाज आशिष नेहरा न्यूझीलंडविरोधातील सामन्यानंतर निवृत्त झाला. मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वात १९९९ मध्ये कसोटी पदार्पण करणाºया आशिष नेहराने २००४ नंतर कसोटी, तर २०११ च्या विश्वचषकातील सामन्यानंतर एकदिवसीय सामना खेळलेला नाही. २००९ मध्ये भारताकडून श्रीलंकेविरोधात टी-२०त पदार्पण करणारा नेहरा आज आश्विन आणि बुमराहनंतर सर्वाधिक बळी मिळवणारा भारताचा तिसरा गोलंदाज आहे. त्याने २७ टी-२० सामन्यांत ३४ बळी मिळवले आहेत. आश्विनने ५२, तर बुमराहने ३८ बळी घेतले आहेत. नेहराने १७ कसोटी सामन्यात ४४, तर १२० एकदिवसीय सामन्यांत १५७ गडी बाद केले आहेत.
विराट कोहली आधी सात कर्णधाराचं वेगवान अस्त्र होता नेहरा - 19 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेहरा सात कर्णधारांबरोबर खेळला आहे. यामध्ये मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे, महेंद्रसिंह धोनी यांचा समावेश आहे. आणि आता विराट कोहली आठवा कर्णधार असेल. ज्याप्रमाणे आधीच्या कर्णधारासाठी त्यानं आपलं 100 टक्के योगदान दिलं त्याचप्रमाणे तो विराट कोहलीसाठीही वेगवान अस्त्र म्हणून प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचणीत आणेल. नेहराचा हा अनुभव विराट कोहलीला नक्कीच फायदाचा ठरणार यात काही शंकाच नाही.