भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) हा सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतो. काव्यात्मक पद्धतीने त्याची कौतुक करण्याची स्टाईल, एखाद्या गोष्टीवरील रोखठोक मत आणि एखाद्याची फिरकी घेण्याची कला, यामुळे वीरूचे ट्विट चर्चेत असतात. यावेळीही त्याने आशिष नेहरा ( Ashish Nehra) याचं नाव घेऊन केलेलं ट्विट व्हायरल झालं आहे. वीरूने ट्विट करून भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहरा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूकीची तयारी करतोय अशा आशयाचे ट्विट केले. त्याने या ट्विटच्या माध्यमातून पाकिस्तानी समालोचक झैद हमीद ( Zaid Hamid) याचे वाभाडे काढले आहेत.
पाकिस्तानी समालोचकाने ट्विट करून पाकिस्तानी भालाफेकपटू अर्षद नदीम ( Arshad Nadeem) याच्या सुवर्णपदकाचा आनंद व्यक्त केला. नदीमने नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ९० मीटर + भालाफेक करून सुवर्णपदक नावावर केले. भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) याने दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यानंतर नदीमने हे सुवर्णपदक जिंकले आणि हमीदने ट्विट केले. यावेळी त्याने भारतीय भालाफेकपटू आशिष नेहराला पराभूत केल्याचा दावा केला. त्याना नीरज चोप्रा लिहायचे होते, परंतु त्याने आशिष नेहरा लिहिले आणि त्यावरून वीरूने त्याचे कान टोचले.
नदीमने दुखापतग्रस्त असतानाही ९०.१८ मीटर भालाफेक करून राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि ही आशियाई भालाफेकपटूंमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. आता नदीमने ९५ मीटर भालाफेकण्याचा विचार केला