भारतीय संघाचा माजी गोलंदाज आशीष नेहरानं नुकतंच माजी कसोटीपटू आकाश चोप्रासोबत सोशल मीडियावरून लाईव्ह गप्पा मारल्या. त्या गप्पांमध्ये नेहरानं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या एका विधानाचा चांगलाच समाचार घेतला. या वर्षात वन डे क्रिकेट हे भारतीय संघाचे लक्ष्य नाही, असे विधान कोहलीनं केलं होतं. न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाला वन डे मालिकेत 0-3 असा सपाटून मार खावा लागला होता. त्यावेळी कोहलीनं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर असल्यानं वन डे मालिकेला इतके महत्त्व नसल्याचं विधान केलं होतं.
Shah Rukh Khan खरंच The Hundred लीगमध्ये गुंतवणूक करणार का? KKR कडून मोठी अपडेट
Corona Virus : औदासीन्य दूर करण्यासाठी इंग्लंड-पाकिस्तान मालिका खेळवा; माजी कर्णधाराची मागणी
न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघानं ट्वेंटी-20 मालिका जिंकली, परंतु वन डे आणि ( 0-3) आणि कसोटी (0-2) मालिकेत त्यांना सपाटून मार खावा लागला. त्यावेळच्या विधानावर नेहरा म्हणाला की,''हे ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचं वर्ष आहे आणि त्यामुळे वन डे क्रिकेटची आम्हाला पर्वा नाही, असे विधान करणं चुकीचं आहे. जर तुला खरंच फरक पडत नव्हता, मग मैदानावर तरी का उतरला? न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत टीम इंडियानं विजयासाठी प्रयत्न केले नाही, असं तुला म्हणायचं आहे का?''
काय म्हणला होता विराट?''यंदाचं वर्ष ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचं आहे. शिवाय कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे सामनेही आहेत. त्यामुळे वन डे क्रिकेट यंदातरी फार महत्त्वाचे नाही,'' असे विराट म्हणाला होता.
कर्णधार म्हणून कोहलीचे वर्क ईन प्रोग्रेस - नेहरा''एक खेळाडू म्हणून विराट कोहलीला स्वतःची वेगळी ओळख सांगणे गरजेचे नाही. त्याचा चढता आलेखच बरच काही सांगून जातो. खेळाडू म्हणून त्यानं स्वतःला सिद्ध केलं आहे, परंतु कर्णधार म्हणून अजून त्याला मेहनत घ्यावी लागेल,'' असे नेहरा म्हणाला.
Virat Kohli च्या 11 वर्षांच्या सोबत्याचे निधन; अनुष्का शर्मानं वाहिली श्रद्धांजली
Shah Rukh Khan आणखी एक संघ खरेदी करणार; तीन संघांचा मालक होणार
जब मिल बैठेंगे तीन यार; बीअर पिण्यासाठी Ravi Shastri यांनी निवडले दोन क्रिकेटपटू
धक्कादायक : ब्राझिलच्या स्टार फुटबॉलपटूच्या Ex-Girlfriend ला अटक