ठळक मुद्देजो काही प्रकार घडला त्याचे मी समर्थन कधीही करणार नाही. पण स्मिथने आपल्याकडून झालेली चूक मान्य केली आहे, असे नेहरा म्हणाला.
नवी दिल्ली : चेंडूशी छेडछाड केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ टीकेचा धनी ठरत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर त्यांच्या क्रिकेट मंडळाने कारवाई केली आहे. त्याचबरोबर आयसीसीने स्मिथवर एका सामन्याची बंदीही घातली आहे. आता त्याच्यावर आजीवन बंदी घालावी की नाही, यावर चर्चा सुरु आहे. पण यावेळी स्मिथच्या समर्थनासाठी सरसावला आहे तो भारताचा माजी गोलंदाज आशीष नेहरा.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून बेनक्रॉफ्टने चेंडूशी छेडछाड केली. त्यानंतर ही आमची रणनिती होती, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने जाहीरही केले. चूक मान्य केल्यावरही आयसीसीने स्मिथला एका सामन्यासाठी निलंबित केले आहे. त्याचबरोबर त्याच्या मानधनातील 100 टक्के रक्कम दंड स्वरुपात कापली जाणार आहे.
स्मिथचे समर्थन करताना नेहरा म्हणाला की, " जो काही प्रकार घडला त्याचे मी समर्थन कधीही करणार नाही. पण स्मिथने आपल्याकडून झालेली चूक मान्य केली आहे. त्यासाठी त्याला संघाचे कर्णधारपद सोडावे लागले आहे. त्याचबरोबर आयसीसीने त्याच्यावर एका सामन्याचे निलंबनही केले आहे, त्याला दंडही ठोठावला आहे. माझ्यामते ही कारवाई योग्य आहे. त्याच्यावर आजीवन बंदी आणी नये, असे मला वाटते. "
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने नेमके केले तरी काय
केप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. पंच जवळ येत असतानाच बेनक्राफ्ट याने आपल्या अंतवस्त्रात एक छोटी पिवळी वस्तु लपवली. जेव्हा पंचांनी त्याला विचारले. तेव्हा पँटमध्ये हात टाकून त्याने ती वस्तु दाखवली. चष्मा साफ करण्याच्या मऊ कपड्यासारखी ती होती. बेनक्राफ्ट याने पत्रकार परिषदेत मान्य केले की तो टेपने चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न करत होता.
Web Title: Ashish Nehra for Smith's support
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.