नवी दिल्ली - आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणारा भारताचा डावखुरा गोलंदाज आशिष नेहरा याने निवृत्त झाल्यानंतर पहिल्यांदाच महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली यांच्याविषयी भाष्य केले आहे. महेंद्र सिंग धोनी हा बऱ्यापैकी शांत आणि संयमी कर्णधार होता तर विराट कोहली सळसळत्या रक्ताचा आणि आक्रमक कर्णधार आहे, असे नेहराने म्हटले आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत आशिष नेहराने महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीच्या कप्तानीविषयी आपले मत मांडले. नेहरा म्हणाला," धोनी आणि विराट कोहलीचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे भिन्न आहे. महेंद्र सिंग धोनी हा बऱ्यापैकी शांत आणि संयमी आहे तर विराट कोहली आक्रमक कर्णधार आहे. धोनीने खेळाडू आणि कर्णधार म्हणून खूप चांगली कामगिरी बजावली आहे. तसेच त्याने योग्यवेळी विराटकडे कर्णधारपद सोपवले आहे."
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आशिष नेहरा म्हणतो, धोनी शांत आणि संयमी तर विराट आक्रमक
आशिष नेहरा म्हणतो, धोनी शांत आणि संयमी तर विराट आक्रमक
आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणारा भारताचा डावखुरा गोलंदाज आशिष नेहरा याने निवृत्त झाल्यानंतर पहिल्यांदाच महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली यांच्याविषयी भाष्य केले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 8:37 PM