ENG vs AUS, Ashton Agar fielding Video: क्रिकेटमध्ये फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीला महत्त्व असा अनेकांचा समज आहे. पण फिल्डिंग हा एक असा विभाग आहे की, जर त्या क्षेत्रात संघाने चांगली कामगिरी केली तरीही संघाची जिंकण्याची शक्यता वाढते. क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा अप्रतिम क्षेत्ररक्षणाचे दृश्य पाहायला मिळते. ते पाहून चाहत्यांचे डोळ्याचे पारणे फिटते. असेच काहीसे गुरुवारी एडिलेड ओव्हल मैदानावर पाहायला मिळाले. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू एश्टन अगरने अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवून दिला.
इंग्लंडच्या डावाच्या ४५व्या षटकात डेव्हिड मलानचा षटकार एश्टन अगरने रोखला. पॅट कमिन्सच्या शॉर्ट बॉलवर मलानने अप्रतिम पुल शॉट खेळला आणि चेंडू षटकारासाठी जाईल असे वाटत होते पण स्क्वेअर लेग बाऊंड्रीवर उभ्या असलेल्या अॅश्टन अगरने हवेत उडी मारून पहिला चेंडू पकडला आणि तो सीमारेषेच्या आत फेकला. मलानच्या ज्या फटक्यावर इंग्लंडला 6 धावा मिळू शकल्या असत्या, त्याजागी क्षेत्ररक्षणामुळे केवळ १ धाव मिळाली. अशाप्रकारे अगरने इंग्लंडसाठी ५ धावा वाचवल्या. पाहा व्हिडीओ-
याआधी एश्टन एगरने लियाम डॉसनला धावबाद केले होते. एश्टन अगरने एका हाताने चेंडू पकडला आणि तो लगेच फेकला आणि डॉसनने एक धाव चोरण्यासाठी त्याची विकेट गमावली. अगरने 10 षटकात 62 धावा दिल्या, पण गोलंदाजीत त्याला विकेट मिळवता आली नाही. असे असले तरी फिल्डिंगमध्ये त्याने दमदार कामगिरी दिली.