Join us

अश्विन आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू

महिलांमध्ये टॅमी ब्यूमोंटला मिळाला मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 02:26 IST

Open in App

दुबई : इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत शानदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारताच्या रविचंद्रन अश्विनने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले. या दमदार कामगिरीच्या जोरावर आयसीसीने महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारासाठी अश्विनची निवड केली. विशेष म्हणजे, या पुरस्काराला सुरुवात झाल्यापासून सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार भारतीय खेळाडूला मिळाला आहे. याआधी आयसीसीने या पुरस्काराने भारताच्या ऋषभ पंतला सन्मानित केले होते.

भारताने इंग्लंडविरुद्धची मालिका ३-१ अशी जिंकत जून महिन्यात होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. भारताच्या या कामगिरीमध्ये अश्विनची कामगिरी निर्णायक ठरली.

रुट, मायर्स यांचे होते आव्हानया पुरस्कारासाठी अश्विनसह इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि वेस्ट इंडिजचा युवा कायल मायर्स यांचेही नामांकन होते. मायर्सने दुसऱ्या डावात केलेल्या २१० धावांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर विंडीजने बांगलादेशविरुद्ध ३९५ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. दुसरीकडे, रुटने एकूण ३३३ धावा काढताना गोलंदाजीत ६ बळीही घेतले होते.

ब्यूमोंटची चमक!महिलांमध्ये सर्वोत्तम ठरलेल्या टॅमी ब्यूमोंटने गेल्या महिन्यात           न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेत छाप पाडली. तिने तीन एकदिवसीय सामन्यांत तीन अर्धशतके झळकावताना एकूण २३१ धावा कुटल्या.

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआर अश्विन