Join us  

IND vs NZ सामन्यात झाल चिटिंग? आर. अश्विननंही केली चॅटिंग, पण...

भारताचा फिरकीपटू आर.अश्विन यानं वादग्रस्त निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केल्याचे पाहायला मिळाले. पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 10:12 AM

Open in App

महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात रन आउट झाल्यावर महिला बॅटरला नॉट आउट दिलेला मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. पहिल्याच सामन्यात भारताविरुद्ध मैदानातील महिला पंचांनीच चिटिंगचा खेळ खेळला अशा प्रकारच्या चॅटिंगचा खेळ सोशल मीडियावर रंगल्याचे पाहायला मिळाले. यात आर. अश्विन याचे एक ट्विटही चर्चेत आले आहे. भारताचा फिरकीपटू आर.अश्विन यानं वादग्रस्त निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केल्याचे पाहायला मिळाले. 

रन आउट न दिल्याचा मुद्दा ठरला कळीचा

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाला ५८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील १४ व्या षटकात अमेलिया केरच्या रन आउटचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. न्यूझीलंडची ही बॅटर दुहेरी धाव घेताना हरमनप्रीत कौरनं विकेट किपर रिचा घोष हिच्याकडे अचूक थ्रो करत तिला रन आउट केले होते. पण मैदानातील महिला पंचांनी पॅव्हेलियनच्या दिशेनं परतणाऱ्या अमेलियाला केरला थांबवलं. धाव घेण्याआधी बॉल डेड झाला होता असं कारण देत तिला नॉट आउट ठरवण्यात आलं. या निर्णयावर भारताची कर्णधार हरमनप्रीत हिने नाराजी व्यक्त केली. एवढेच नाही तर भारतीय संघाचे प्रशिक्षक अमुल मझुमदार हे देखील सामनाधिकऱ्यांशी चर्चा करताना दिसले.

अश्विननं ट्विट केल, पण...

 सोशल मीडियावर हा मुद्दा चर्चेचा ठरत आहे. भारतीय क्रिकेट चाहते डेड-बॉल कॉलच्या तर्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत. फलंदाज दुसरी धाव घेत असतील तर तो डेड बॉल कसा? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर गप्प राहणं अश्विनलाही जमलं नाही. त्याने यावर एक ट्विट केल्याचे पाहायला मिळाले. "दुसरी धाव सुरू होण्याआधीच डेड कॉल देण्यात आला. यात दोष कुणाचा? असा प्रश्न अश्विननं उपस्थितीत केला होता. पण त्याने काही वेळातच हे ट्विट डिलिट केले. 

R Ashwin Twitt

 चूक कोणाची?

डेड बॉल संबंधित नियम २० नुसार, कलम २०.१ मध्ये असं म्हटलं आहे की, "जेव्हा बॉलर एन्ड अंपायर हे सुनिश्चित होते की,  आणि फिल्डिंग करणाऱ्या मंडळीसह क्रिजमध्ये असलेल्या बॅटर अंतिम पंचाला हे स्पष्ट होईल की क्षेत्ररक्षणाची बाजू आणि क्रिजवरील दोन्ही फलंदाजांनी बॉल डेड झाल्याचे मान्य केले आहे. भारत न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात जे चित्र दिसलं ते यापेक्षा वेगळं होते. दोन्ही संघातील खेळाडूंनी ते मान्य केल्याचे दिसले नाही. त्यामुळे चूक कोणाची असा अश्विन उपस्थितीत केला प्रश्न निर्माण होतो. पण ज्याने सामना नीट पाहिला आहे त्याच्या हे देखील लक्षात आले असेल की, न्यूझीलंडच्या बॅटर्संनी एक धाव घेतल्यानंतर पंचांनी गोलंदाजी संपवलेल्या दीप्ती शर्माकडे तिची कॅप दिली. हा  बॉल डेट झाल्याचा संकेत होता.  

डेड-बॉलचा नियम काय? 

  • MCC नियम २०.१.२ - गोलंदाजी एन्डला असणाऱ्या अंपायरला ज्यावेळी हे स्पष्ट होते की, फिल्डिंग करणारी टीम आणि क्रिजवर असणाऱ्या बॅटर्संनी चेंडू खेळाचा भाग नाही हे मान्य केले आहे. 
  • MCC नियम २०.२ - चेंडू फायनली सेटल ( प्लेइंग कंडीशनमध्ये) आहे की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा केवळ अंपा.रचा आहे.  
  • MCC नियम २०.३- हा नियम कॉल ऑफ ओव्हर आणि टाइमसंदर्भातील आहे. यात ना ओव्हरची घोषणा  (नियम १७.४)  ना ही टाइम संदर्भातील घोषणा (नियम १२.२) तोपर्यंत करता येणार नाही जोपर्यंत बॉल डेड होत नाही. किंवा नियम २०.१  किंवा २०.४ प्रमाणे यासंदर्भात निर्णय घ्यावा. 
  • MCC नियम २०.४.१-  हा नियम अंपायर कॉल आणि डेड बॉल स‍िग्नल संदर्भात आहे. यात नियम २०.१ प्रमाणे अंपायर खेळाडूंना सूचित करण्यासाठी डेड बॉलचा संकेत देऊ शकतो. 
टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकभारतन्यूझीलंडआर अश्विनहरनमप्रीत कौर