मुंबई - श्रीलंके विरुद्धची कसोटी मालिका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ सोमवारी जाहीर करण्यात आला. श्रीलंके विरुद्धच्या मालिकेसाठी मुंंबईकर अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली.
रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजाने कसोटी संघात पुनरागमन केले असले तरी, त्यांना टी-20 संघात स्थान मिळालेले नाही. या दोघांना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले होते. श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज या दोघांचा टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे.
श्रीलंकेचा संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौ-यावर येणार आहे. श्रीलंके विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी संघ निवडण्यात आला आहे. 16 नोव्हेंबरपासून कोलकात्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
भारतीय कसोटी संघ - विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पूजारा, रोहित शर्मा, वृद्धीमान सहा, आर.अश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पांडया, मोहम्मद शामी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा.
न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघ विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, एमएस धोनी (विकेटकिपर), हार्दिक पांडया, अक्षर पटेल, यझुवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, मोहम्मद सिराज,