कसोटी क्रमवारीत अश्विनचे अव्वल स्थान कायम; अष्टपैलूंमध्ये रवींद्र जडेजाचे वर्चस्व

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीत फारसे बदल झालेले नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 06:06 AM2024-08-22T06:06:19+5:302024-08-22T06:06:52+5:30

whatsapp join usJoin us
Ashwin retains top spot in Test rankings; Ravindra Jadeja dominates all-rounders | कसोटी क्रमवारीत अश्विनचे अव्वल स्थान कायम; अष्टपैलूंमध्ये रवींद्र जडेजाचे वर्चस्व

कसोटी क्रमवारीत अश्विनचे अव्वल स्थान कायम; अष्टपैलूंमध्ये रवींद्र जडेजाचे वर्चस्व

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई : भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याने कसोटी क्रमवारीत गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे. तसेच, अष्टपैलूंमध्ये रवींद्र जडेजा अव्वल स्थानी, तर अश्विन दुसऱ्या स्थानी कायम आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीत फारसे बदल झालेले नाहीत. अश्विन ८७० गुणांसह अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड (८४७) आणि भारताचा जसप्रीत बुमराह (८४७) संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने एका स्थानाने प्रगती करत चौथे स्थान पटकावले. रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर असून, यासह अव्वल दहामध्ये तीन भारतीय गोलंदाजांनी स्थान मिळवले आहे. 

फलंदाजी क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. इंग्लंडचा जो रुट (८७२) अव्वल स्थानी आहे. अव्वल दहामध्ये तीन भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. कर्णधार रोहित शर्मा (७५१) सहाव्या स्थानी असून, यशस्वी जैस्वाल (७४०) आठव्या, तर विराट कोहली (७३७) दहाव्या स्थानी आहे. सलामीवीर शुभमन गिलने एका स्थानाने प्रगती करत १८वे स्थान पटकावले.

अष्टपैलूंमध्ये दबदबा
कसोटी अष्टपैलूंमध्ये भारताच्या जडेजा आणि अश्विन यांनी आपला दबदबा कायम राखताना अनुक्रमे पहिले दोन स्थान कायम राखले आहे. जडेजा ४४४ गुणांसह, तर अश्विन ३२२ गुणांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहे.

 नुकत्याच झालेल्या द. आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी केलेल्या वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरने दोन स्थानांनी प्रगती करत पाचवे स्थान पटकावले. 

 भारताचा अक्षर पटेल एका स्थानाने सहाव्या स्थानी घसरला आहे.

Web Title: Ashwin retains top spot in Test rankings; Ravindra Jadeja dominates all-rounders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.