Join us  

आश्विन जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटू - मुथय्या मुरलीधरन

सध्याच्या घडीला रविचंद्रन आश्विन जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटू असल्याचे मत श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने व्यक्त केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 2:04 AM

Open in App

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला रविचंद्रन आश्विन जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटू असल्याचे मत श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने व्यक्त केले. आश्विनची कामगिरी कमालीची आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास त्याच्या आसपास कोणी दिसत नसल्याचे मुरली म्हणाला.श्रीलंकेविरु द्धच्या नागपुरातील दुसºया कसोटी सामन्यात आश्विनने ५४ सामन्यांत ३०० बळींचा टप्पा गाठला होता. त्याने डेनिस लिलीचा विक्र म मोडीत काढत क्रि केटच्या मैदानात नवा इतिहास रचला. याआधी एकाही खेळाडूने इतक्या कमी डावांमध्ये ३०० बळी घेतलेले नाहीत. १११ वनडेत आश्विनचे १५० बळी आहेत.भारतीय संघाच्या कामगिरीचेदेखील त्याने कौतुक केले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ चांगली कामगिरी करीत आहे. श्रीलंका आणि भारत यांच्यात खूप क्रि केट झाले. यात नेहमीच विराटने बाजी मारली. भारतीय संघ खरोखर खूप चांगला खेळत आहे. त्यांना मी अधिक गुण देईन, असे तो म्हणाला.श्रीलंका संघातील खेळाडूंची कामगिरी निराशाजनक आहे. युवा खेळाडूंच्या अपयशामुळे संघाची डोकेदुखी वाढत आहे. मागील काही दिवसांपासून संघाची कामगिरीखूपच खालावली आहे. ही चिंताजनक बाब असल्याचे मुरलीधरनने नमूद केले.दुखापतीपासून दूर राहण्याचे आव्हानविक्र मवीर आश्विनला शुभेच्छा देताना मुरलीधरन म्हणाला, की आश्विन अवघ्या ३२ वर्षांचा आहे. तो आणखी चार ते पाच वर्षे खेळू शकतो. यासाठी त्याला चांगल्या कामगिरीसोबतच दुखापतीपासून दूर राहण्याचे आव्हान असेल. वयाच्या पस्तिशीनंतर मैदानावरील कामगिरीत सातत्य राखणे खूप कठीण असते.

टॅग्स :क्रिकेटभारतभारतीय क्रिकेट संघ