कोलंबो, दि. 04 - कोलंबो कसोटीत पहिल्या डावांत भारताच्या अष्टपैलू खेळाडू आर. अश्विनने दमदार फलंदाजी करताना अर्धशतक ठोकलं. अश्विनेनं 54 धावां करताच कसोटीमध्ये 2000 धावांचा पल्लाही पार केला. सर्वात कमी कसोटी सामन्यात 2000 धावा आणि 275+ विकेट करण्याचा पराक्रम आर. अश्विननं केला. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या सर रिचर्ड हेडलीच्या नावावर होता.गेल्या दहा दिवसांत अश्विननं सर रिचर्ड हेडलीचा विक्रम दोन वेळा तोडला आहे. लंकेविरुद्ध 26 जुलै रोजी पहिल्या कसोटी सामना खेळला. हा अश्विनचा 50 वा कसोटी सामना होता. 50 कसोटीध्ये 275+ विकेट घेण्याचा विक्रम या वेळी त्यानं आपल्या नावावर केला. हा विक्रम सर रिचर्ड हेडली यांच्या नावावर होता. हेडली यांनी 36 वर्षापूर्वी 1981मध्ये 50 व्या कसोटी सामन्यात 262 विकेट घेतले होते. अश्विनने 51 कसोटीमध्ये 281 विकेट घेतल्या आहेत. या साठी हेडली यांना 58 कसोटी सामने खेळावं लागले होतं. 2000 धावा आणि 250 विकेट घेण्यासाठी इयान बॉथम, इमरान खान यांना 55 कसोटी सामने खेळावे लागले होते. तर शॉन पोलॉकला 60 कसोटी सामने खेळावे लागले होते.दुसऱ्या कसोटीत अश्विनने फलंदाजीनंतर गोलंदाजी करतानाही आपली चमक दाखवली. अश्विनने श्रीलंकेच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांना बाद करत भारताच्या विजयाच्या आशा वाढवल्या आहे. दुसऱ्या दिवसाअखेरीस श्रीलंकेने 2 गडी गमावून 50 धावा केल्या आहेत. श्रीलंका आणखी 572 धावांनी पिछाडीवर आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 622 धावांचा डोंगर उभा केला.
पुजाराच्या चार हजार धावाचेतेश्वर पुजाराने ५० व्या कसोटीत १३ व्या शतकांसह चार हजार धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो १५ वा भारतीय फलंदाज ठरला. गालेतील पहिल्या कसोटीत १५३ धावा ठोकणा-या पुजाराने आज ८४ व्या डावात ३४ वी धाव घेताच चार हजार धावा पूर्ण केल्या.५० व त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळणारा पुजारा ६१ वा भारतीय खेळाडू असून, सुवर्ण महोत्सवी कसोटीत शतक नोंदविणारा तो सातवा फलंदाज आहे. भारताकडून सुवर्ण महोत्सवी कसोटीत सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावे आहे. त्यांनी १९७९ मध्ये इंग्लंडविरुद्ध ओव्हलवर दुसºया डावात २२१ धावा ठोकल्या होत्या. ५० व्या कसोटीत शतक ठोकण्याचा मान सर्वप्रथम पॉली उम्रीगर यांनी पटकविला. पाकविरुद्ध १९६१ मध्ये नवी दिल्लीत त्यांनी ११२ धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर गावस्कर, गुंडप्पा विश्वनाथ, कपिल देव, व्हीव्हीएस लक्ष्मण, विराट कोहली आणि आता पुजारा यांनी या यादीत स्थान मिळविले.