ठळक मुद्दे श्रीलंकेला पहिल्या सामन्यात बांगालादेशकडून पराभव पत्करावा लागला होता.
दुबई, आशिया चषक 2018 : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
अफगाणिस्तानचा पहिला, तर श्रीलंकेचा हा दुसरा सामना आहे. श्रीलंकेला पहिल्या सामन्यात बांगालादेशकडून पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यातही बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यातही श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळालेली नाही.
दोन्ही संघश्रीलंका
अफगाणिस्तान