दुबई, आशिया चषक 2018 : पहिल्याच षटकात बांगलादेशला दोन धक्के बसले होते. पण त्यानंतर मुशफिकर रहिम आणि मोहम्मद मिथून यांनी अर्धशतके झळकावून संघाला सावरले. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा बांगलादेशची 25 षटकांत 2 बाद 134 अशी स्थिती होती.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. कारण पहिल्याच षटकात त्यांना दोन फलंदाज गमवावे लागले. जवळपास एका वर्षानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करणारा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने बांगलादेशला दुहेरी धक्के दिले.
बांगलादेशची पहिल्याच षटकात 2 बाद 1 अशी दयनीय अवस्था होती. पण त्यानंतर रहिम आणि मिथून यांनी 131 धावांची भागीदारी रचली आणि संघाला सावरले. मिथूनने 63 धावांची खेळी साकारली, पण अखेर तो मलिंगाचाच बळी ठरला.